AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी, तणावाच्या वातावरणात तब्बल 85 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. मात्र त्याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक मोठा घोटाळा समोर आला आहे.

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी, तणावाच्या वातावरणात तब्बल 85 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर
| Updated on: Apr 28, 2025 | 9:45 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. मात्र त्याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याला इम्पोर्ट स्कॅम असं नाव देण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार भारतामधील सामान दुसऱ्या देशांच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये पोहोचत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील थेट व्यापार बंद आहे, असं असताना देखील हा घोटाळा घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा घोटाळा 10 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 85 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा आहे. आर्थिक थिंक टँक जीटीआरआयच्या माध्यमातून हा घोटाळा समोर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जीटीआरआयच्या रिपोर्टनुसार भारतातून दरवर्षी 10 अब्ज डॉलर किंमतीचा विविध माल दुबई, सिंगापूर आणि कोलंबो बंदरातून अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानमध्ये पाठवला जात आहे.जीटीआरआयनं केलेल्या दाव्यानुसार भारतीय कंपन्या या बंदरावर माल पाठवतात, त्यानंतर तिथे एक स्वतंत्र कंपनी हा माल आपल्या ताब्यात घेते. बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये हा मला साठवला जातो.येथे वाहतुकीदरम्यान शुल्क न भरता माल ठेवता येतो. त्यानंतर मूळ देश दुसरा दाखवण्यासाठी वस्तूंचे लेबल आणि कागदपत्रे बदलली जातात.त्यामुळे हा माल भारतामधून नाही तर दुसऱ्याच कोणत्यातरी देशातून आला आहे, असे भासवले जाते. नंतर हा मला जास्त किंमतीला विकला जातो.

यासंदर्भात जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी माहिती देताना म्हटलं की, हे मॉडेल बेकायदेशीर नसले तरी यामुळे दिशाभूल होते.जीटीआरआय अंदाजानुसार या मार्गानं दरवर्षी तब्बल 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू भारतातून पाकिस्तानला जातात.या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये भारताची पाकिस्तानला निर्यात 447.65 दशलक्ष डॉलर्स होती. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार देखील थांबला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार देखील या घोटाळ्याची माहिती घेत असून,भारतातून पाकिस्तानला अप्रत्यक्ष निर्यात किती झाली, याची आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.