AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मध्य पूर्वेतून भारतासाठी सर्वात मोठी बातमी, इराण मित्र भारताच्या मदतीला धावला, आता मोठं संकट टळणार

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इराण युद्धामध्ये गुंतलेला असताना देखील इराणने भारताची मोठी मदत केली आहे. मध्य पूर्वेतून भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मध्य पूर्वेतून भारतासाठी सर्वात मोठी बातमी, इराण मित्र भारताच्या मदतीला धावला, आता मोठं संकट टळणार
pm modi, pezeshkian
| Updated on: Apr 01, 2026 | 6:15 PM
Share

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे तसेच इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज तेल वाहतुकीसाठी बंद केल्यानं जगातील अनेक देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका हा भारताला देखील बसला आहे. भारतामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढले आहेत. तर अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यानं हॉटेल चालकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामध्ये हॉटेल चालकांचं प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान आता मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर आली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र याचदरम्यान भारतासाठी दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणमधून कच्च्या तेलाचं एक जहाज आता भारतामध्ये येत आहे. फारसच्या खाडीमधून जहाज भारताकडे निघालं आहे. तब्बल सात वर्षानंतर आता भारतामध्ये इराणचं कच्च तेल इंपोर्ट होण्याची शक्यता आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार पिंग शुन नावाचं हे जहाज भारताकडे निघालं आहे. त्याने सिग्नल देण्यास सुरुवात केली आहे, या आठवड्याच्या शेवटपर्यंत हे जहाज भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजामध्ये तब्बल 5 लाख बॅरल एवढं कच्च तेल आहे.

शिप ट्रॅकिंग डेटानुसार या जहाजानं मार्चच्या सुरुवातीला खार्ग आयसलँडमधून कच्च तेल भरलं होतं. ते सध्या तरी भारताकडे येताना दिसत आहे. मात्र अजूनही या जहाजाचं टेस्टिनेशन फायनल झालेलं नाही, मात्र ते भारताकडे निघाल्याचं दिसून येत आहे. या आठवड्याच्या शेवटी हे जहाज भारतामध्ये पोहोचू शकतं. हे जहाज भारतामध्ये आल्यास भारताला मोठा दिलासा मिळणार आहे, काही प्रमाणात का होत नाही, भारतामधील इंधनाचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. इराणमधून कच्च तेल आता भारतामध्ये येत आहे.

Follow Us
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?