AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा झटका… दीपकेंच्या उद्याच्या तिरंगा मार्चपूर्वीच कोर्टाचा मोठा निर्णय; पोलीस म्हणाले, अ‍ॅक्शन घेऊ…

कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्या १० ऑक्टोबरच्या तिरंगा मार्चला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे याचिकाकर्ते आणि पोलिसांना धक्का बसला, तर दीपके यांना दिलासा मिळाला. पोलीस मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा देत आहेत. दीपके यांनी नागरिकांना मार्चमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

सर्वात मोठा झटका... दीपकेंच्या उद्याच्या तिरंगा मार्चपूर्वीच कोर्टाचा मोठा निर्णय; पोलीस म्हणाले, अ‍ॅक्शन घेऊ...
abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 5:39 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी उद्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे तिरंगा मार्चचं आयोजन केलं आहे. त्याला विरोध करणारी याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या रॅलीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने रॅलीवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांना आणि याचिकाकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. तर कॉकरोच जनता पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे पोलिसांनी तिरंगा रॅली निघाली तर आम्ही कठोर अ‍ॅक्शन घेऊ, असं कोर्टाला स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्याच्या तिरंगा मार्चमध्ये काय होतंय? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन साम्ब्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पालिका बाजारातील फुटपाथवरील विक्रेत्यांनी तिरंगा मार्चच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टाने तिरंगा मार्चला स्थगिती दिली नाही. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखू. त्यासाठी पोलीस आवश्यक ते पाऊलं उचलणार असून अभिजीत दीपकेंच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत, असं एसीजी चेतन शर्मा यांनी कोर्टाला स्ष्ट केलं. त्यामुळे उद्याच्या तिरंगा मार्चवेळी दिल्लीत मोठ्या घटना घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दीपकेंचं आवानह काय?

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील जनतेला उद्याच्या तिरंगा मार्चमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, उद्या संध्याकाळी 5 वाजता तिरंगा मार्चमध्ये सामील व्हा. आशुतोष आणि सौरव दासला तिरंगा फडकावला म्हणून अटक करण्यात आली आहे. तिरंगा फडकावणं हा काही गुन्हा नाहीये. आमच्यासाठी तिरंग्यापेक्षा कोणीच मोठं नाहीये. मी सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांना आव्हान करतो की तुम्ही उद्याच्या मार्चमध्ये सामील व्हा, असं दीपके यांनी म्हटलं आहे.

जे लोक दिल्लीत येऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या शहरात तिरंगा मार्च रॅली काढा. या हुकूमशाहांना तिरंगा आमचा स्वाभिमान असल्याचं दाखवून द्या. तिरंगा फडकावणं हा काही गुन्हा नाहीये, हे यांना दाखवून द्या. कदाचित या मार्चनंतर मलाही तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. पण तिरंगा माझ्यासाठी शान आहे. तिरंग्याशिवाय कोणीही मोठं नाही, असं दीपके म्हणाले. दरम्यान, उद्याच्या तिरंगा मार्चच्या पार्श्वभूमीवर कॅनॉट प्लेसमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात येत आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....