Supreme Court: कोरोनाच्या याचिकेआडून पब्लिसिटी स्टंट; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला झापले

कर्नाटकातील एका वकिलाने दाखल केलेली ही जनहित याचिका न्यायमूर्ती एस. के. कौल आणि एम. एम. सुंद्रेश यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. ही कुठल्या प्रकारची याचिका आहे. काय चाललेय? असे वाटते की कुणाला न्यायालयात यायचेय म्हणून आमच्याकडे याचिका दाखल केलीय.

Supreme Court: कोरोनाच्या याचिकेआडून पब्लिसिटी स्टंट; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला झापले
सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : कोरोना महामारी हे चीनचे पाप असल्याचे सर्वश्रुत झाले आहे. संपूर्ण जग चीनकडे बोट दाखवत आहे. असे असताना आता पुन्हा याच मुद्द्यावरून चीनला जबाबदार धरून कारवाईची मागणी करणारी याचिका कर्नाटकातील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालय याचिकाकर्त्यावरच चांगलेच संतापले आणि त्याची कडक शब्दांत कानउघाडणी केली. प्रसिद्धीचा खटाटोप करीत अशा प्रकारची याचिका दाखल करू नका, असा दमच न्यायालयाने दिला. आम्ही कोरोना महामारीचे कारण आणि त्यावरील उपाय सुचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला याचिका दाखल करण्यास परवानगी देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले आणि संबंधित याचिका फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले

चीनला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले की, ही याचिका म्हणजे प्रसिद्धी स्टंटचे माध्यम असल्याचे दिसते. ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? आंतरराष्ट्रीय प्रभाव आहे की नाही आणि चीन नरसंहार करत आहे की नाही हे ठरवणे न्यायालयाचे काम आहे का? कोरोनावर उपाय सुचवायचेत म्हणून आम्ही प्रत्येकाला याचिका करण्यास मुभा देऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडतेय? चीन ‘नरसंहार’ करतेय का? हे पाहणे आमचे काम नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

न्यायालयाने याचिका फेटाळली

कर्नाटकातील एका वकिलाने दाखल केलेली ही जनहित याचिका न्यायमूर्ती एस. के. कौल आणि एम. एम. सुंद्रेश यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. ही कुठल्या प्रकारची याचिका आहे. काय चाललेय? असे वाटते की कुणाला न्यायालयात यायचेय म्हणून आमच्याकडे याचिका दाखल केलीय. बाकी काही नाही, अशी मते व्यक्त करीत खंडपीठाने संबंधित याचिकेत हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. कोरोनावर उपायांबाबत विचार करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला याचिका दाखल करण्यास आम्ही मुभा देऊ शकत नाही. अशा व्यक्तींनी प्रशासनाकडे आपली मते मांडावीत, याबाबत त्यांना कुणीही अडवलेले नाही. या प्रकरणातील याचिकाकर्ता केवळ मीडियात नाव प्रसिद्ध होण्याच्या अपेक्षेने येथे आल्याचे दिसतेय, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. (A petition seeking action against China for coronation was rejected by the Supreme Court)

इतर बातम्या

Kerala Crime : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक, राज्यातील अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोना चाचणीची गरज नाही! केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?

Published On - 12:35 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI