10 हजारात हर्बल कंपनी सुरू केली अन्… तिची कहानी वाचाच!

10 हजारात हर्बल कंपनी सुरू केली अन्... तिची कहानी वाचाच!

भारतात नोकरीला लाथ मारुन व्यवसाय सुरु करणारे आणि त्यात यशस्वी होणारी अनेक उदाहरणं पाहायला मिळालीत.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 02, 2021 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतात नोकरीला लाथ मारुन व्यवसाय सुरु करणारे आणि त्यात यशस्वी होणारी अनेक उदाहरणं पाहायला मिळालीत. अशा उदाहरणांमध्ये संबंधितांनी कोणता व्यवसाय करण्यास सुरुवात केली हेही महत्त्वाचं असतं. व्यवसायाची कल्पना जितकी वेगळी आणि लोकांना प्रभावित करणारी असेल तितकं त्या व्यवसायाला अधिक यश मिळतं. असंच एक आगळंवेगळं उदाहरण बंगळुरुमध्ये पाहायला मिळालंय. बंगळुरुमध्ये राहणारी निता अदप्पा यांनी असाच मोठा निर्णय घेत नोकरीला लाथ मारली आणि व्यवसाय सुरु केला. आता त्यांच्या व्यवसासायाची उलाढाल थेट कोट्यावधी रुपयांमध्ये आहे (A success business story of Women in Bengaluru about Herbal products ).

विशेष म्हणजे निता अदप्पा यांनी नोकरी सोडून आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात केवळ 10 हजार रुपयांमध्ये केली होती. अनेकांना निता यांनी सध्या कोट्यावधींची उलाढाल करणारा व्यवसाय केवळ 10 हजार रुपयांमध्ये सुरु केला असेल यावर विश्वास बसत नाही. मात्र, हे खरं आहे. त्यामुळेच निता यांच्या या खास व्यवसायाचा आढावा. यातून आपणही व्यवसायाची कल्पना मिळवू शकतो आणि चांगला पैसा कमावू शकतो.

निता एका सर्वसामान्य कुटुंबातून आल्यात. त्यांचे पती एका हर्बल प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपनीचे सेल्स मॅनेजर होते. निताने मुंबईतील एका कॉलेजमधून फार्मसीमध्ये मास्टर्स केलं आणि त्यानंतर नोकरी करणं, पुढील शिक्षण करणं किंवा परदेशात जाणं असे पर्याय होते. त्यांनी सुरुवातीला नोकरीचा पर्याय निवडला. मात्र त्यांचं नोकरीत मन रमलं नाही आणि त्यांनी 6 महिन्यातच नोकरीला रामराम ठोकला. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे व्यवसाय?

1995 मध्ये हातातील चांगली नोकरी सोडून व्यवसाय करणं कोणत्याही महिलेसाठी फार अवघड होतं. तेव्हाच्या काळातही निता यांनी आपल्या व्यवसायासाठी मेहनत घेतली आणि वेगळी उंची गाठलीय. त्यावेळी त्यांनी प्रकृती हर्बल्स नावाने एक कंपनी सुरु केली. या कामात त्यांना त्यांचे कॉलेजचे ज्युनियर अनिशा देसाई यांनीही मोलाची मदत केली. दोघींनी हेअर केअर, स्कीन प्रोडक्टवर सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर अखेर 10 हजार रुपयांची गुंतवणूक करत व्यवसाय सुरु केला.

व्यवसाय कसा वाढवला?

बाजारात अनेक प्रकारचे हेअर केअर आणि स्कीन केअर प्रोडक्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करताना निता यांनी सर्वात आधी हॉटेल्समध्ये जाऊन आपल्या प्रोडक्टची विक्री केली. त्यांनी हॉटेलवर जाऊन डिलिव्हरी दिली. यानंतर त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढत गेली. आज अनेक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या वस्तू घेतल्या जात आहेत. 2011 मध्ये त्यांनी रिटेल मार्केटमध्ये देखील प्रवेश केला. सध्या त्यांनी फेस स्क्रब, हेयर मास्क, हेयर ऑईल, शँपू, कंडीशिनर विकण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

वयाच्या 11 वर्षांपासून दूग्ध व्यवसायात उडी, महिन्याला 6 लाख रुपये कमावणाऱ्या श्रद्धाची थक्क करणारी यशोगाथा

Special Story | जैविक शेतीतून केळी उत्पादनात दुप्पट फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

Special Story | अर्ध्या एकरात सुरु केलेल्या नर्सरीचा सात एकरावर विस्तार; 10 लाखांचा नफा मिळवणाऱ्या भंडाऱ्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा

व्हिडीओ पाहा :

A success business story of Women in Bengaluru about Herbal products

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें