AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 11 वर्षांपासून दूग्ध व्यवसायात उडी, महिन्याला 6 लाख रुपये कमावणाऱ्या श्रद्धाची थक्क करणारी यशोगाथा

वयाच्या 11 व्या वर्षापासून वडिलांसोबत डेअरी व्यवसायात (milk dairy) उतरलेल्या श्रद्धा धवनची (shraddha dhawan) गोष्ट काही औरच आहे.

वयाच्या 11 वर्षांपासून दूग्ध व्यवसायात उडी, महिन्याला 6 लाख रुपये कमावणाऱ्या श्रद्धाची थक्क करणारी यशोगाथा
| Edited By: | Updated on: Jan 31, 2021 | 7:09 PM
Share

अहमदनगर : आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्याला कोणीही थांबवू शकत नाही, असं म्हटलं जातं. हेच सूत्र समोर ठेवून शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. अनेक शेतकरी कल्पनाशक्ती वापरून लाखोंची कमाई करत आहेत. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, वयाच्या 11 व्या वर्षापासून वडिलांसोबत डेअरी व्यवसायात (milk dairy) उतरलेल्या श्रद्धा धवनची (shraddha dhawan) गोष्ट काही औरच आहे. (success story of 21 year old shraddha dhawan who started her own milk dairy)

श्रद्धा मूळची अहमदनगर जिल्ह्याची. सध्या ती 21 वर्षांची आहे. मात्र, वयाच्या 11 वर्षांपासून ती वडिलांसोबत दूध डेअरीच्या व्यवसायात काम करते आहे. वडिलांचा संपूर्ण उद्योग श्रद्धाच सांभाळते असं म्हटलं तरी ठरणार नाही. एका म्हशीपासून डेअरी व्यवसायाची सुरुवात केलेल्या श्रद्धाची वार्षिक उलाढाल आता 72 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

व्यवसायाची सुरुवात कशी?

श्रद्धाच्या वडिलांची सुरुवातीला एक छोटीशी दूध डेअरी होती. त्यांच्याकडे 6 म्हशी होत्या. या म्हशींपासून मिळणाऱ्या दुधाला विकून ते कुटुंबाचा खर्च भागवत असत. मात्र, शरीराने अपंग असल्यामळे त्यांना डेअरीचा व्यवसाय सांभाळणे कठीण झाले. दूध विकण्यासाठी त्यांना दूरपर्यंत प्रवास करावा लागायचा. पण अपंग असल्यामुळे ते त्यांना शक्य होत नव्हतं. या सर्व कारणांमुळे त्यांचा उद्योग संपण्याच मार्गारव आला. 6 पैकी 5 म्हशी त्यांना विकाव्या लागल्या. 1998 मध्ये श्रद्धाच्या वडिलांकडे फक्त एक म्हैस शिल्लक राहिली. श्रद्धाच्या वडिलांना कुटुंब चालवणे अवघड होऊ लागले. या साऱ्या गोष्टींची चुणूक श्रद्धाला लागली आणि तिने वडिलांसोबत काम करण्याचं ठरवलं.

शिक्षण करत उद्योग सांभाळला

वडिलांची होत असलेली परवड श्रद्धाला लहानपणीच समजली. वयाच्या 11 व्या वर्षीच तिने वडिलांसोबत काम करायचे ठरवले. दूध काढण्यापासून तर ते विकण्यापर्यंतची सर्व कामं श्रद्धाने केली. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे सुरुवातीला श्रद्धाचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. मात्र, व्यवसाय आणि शिक्षण असं दोन्ही सांभाळत तिने वडिलांचा हा व्यवसाय चांगलाच जमवला. आज

उद्योगात ग्रोथ कशी झाली?

शिक्षण आणि कल्पकतेच्या जोरावर श्रद्धाने तिचा डेअरी उद्योग वाढवला. आज श्रद्धा आणि तिचे कुटुंबीय महिन्याला 6 लाख रुपये कमावतात. कल्पक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जोरावर तिने एवढी उलाढाल केली. त्यासाठी श्रद्धाने म्हशींचा आहार, त्यांचे आरोग्य अशा सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती मिळवली. तसेच, आपल्या व्यवसायात वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून तिने दूध डेअरी चालवली. श्रद्धा आपल्या म्हशींना फक्त सेंद्रीय चारा देते. त्यामुळे म्हशींच्या दुधाला बाजारात चांगला भाव मिळतो. कुठलीही भेसळ न करता श्रद्धा दूध डेअरीचा व्यवसाय करते. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

दूध देअरीची उलाढाल किती?

एका म्हशीच्या दूधापासून सुरु झालेला श्रद्धाचा दूध डेअरीचा व्यवसाय आता चांगलाच वाढला आहे. श्रद्धाकडे सध्या 80 म्हशी आहेत. या डेअरीची वार्षिक उलाढाल 72 लाखांवर पोहोचली असून श्रद्धा महिन्याला 6 लाखांचा निव्वळ नफा कमावते. श्रद्धा आणि तिच्या कुटुंबीयांनी सुरु केलेल्या या व्यवसायामध्ये दिवसाला 450 लीटर दुधाचे उत्पादन होते.

दरम्यान, वडील अपंग असल्यामुळे श्रद्धाने परिस्थितीचे भांडवल न करता मुलगी असूनसुद्धा स्व:तच्या हिमतीवर आपला व्यवसाय वाढवला. तिच्या या यशाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Milk Agitation | महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी, दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका : मंत्री सुनील केदार

(success story of 21 year old shraddha dhawan who started her own milk dairy)

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.