देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2025-26 साखरेच्या हंगामाची सुरुवात मजबूत झाली आहे. यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे.

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
sugar production
| Updated on: Jan 02, 2026 | 6:23 PM

India sugar production: भारतात चालू आर्थिक वर्षे 2025–26 साखरेच्या सिझनची जोरदार सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेड अर्थात NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये देशातील साखरेचे सरासरी वार्षिक उत्पादन 23.43 टक्के वाढून 11.83 मिलियन टन पोहचले आहे. गेल्यावर्षी याच काळात साखरेचे उत्पादन 9.56 मिलियन टन होते. देशातील साखरेच्या उत्पादन वाढीमागे महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील वाढ कारणीभूत ठरली आहे. NFCSF बुधवारी जारी केलेल्या निवदेनात सांगितले की 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशातील सुमारे 499 साखर कारखान्यांनी गळीप हंगामात भाग घेतला. या दरम्यान 134 मिलियन टन ऊसाचे गाळप झाले. ज्यामुळे 11.8 मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले. या दरम्यान सरासरी साखरेची रिकव्हरी 8.83 टक्के राहिली.

उत्तर प्रदेशात वाढले उत्पादन

देशात सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशात देखील उत्पादनात सुधारणा पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2025 दरम्यान उत्तर प्रदेशात साखर उत्पादन वाढून 3.56 मिलियन टन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात हे उत्पादन 3.26 मिलियन टन होते. ही वाढ महाराष्ट्राच्या तुलनेत कमी राहिली, परंतू अजूनही उत्तर प्रदेश आतापर्यंतचा देशातील साखरेचा सर्वात मोठा उत्पादक राज्य म्हणून कायम आहे.

महाराष्ट्र बनला साखरेचा ग्रोथ इंजिन

देशाचे दुसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. या राज्यात साखरेचे उत्पादन 63 टक्के वाढून 4.87 मिलियन टन पोहचले आहे. जे गेल्यावर्षी याच काळात 2.99 मिलियन टन होते. चांगली रिकव्हरी, अधिक ऊस उपलब्धता आणि साखरे कारखान्याची निरंतर गाळप क्षमतेमुळे महाराष्ट्र या हंगामात ग्रोथ इंजिन बनला आहे.

कर्नाटक आणि अन्य राज्याचे योगदान

कर्नाटकात देखील साखर उत्पादन वाढून 2.21 मिलियन टन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच काळात 2.05 मिलियन टन उत्पन्न झाले होते. याशिवाय गुजरातमध्ये साखरचे उत्पादन 2,85,000 टन, बिहारात 1,95,000 टन आणि उत्तराखंडात 1,30,000 टन उत्पन्न नोंदवले गेले आहे. या राज्याचे योगदान भलेही अपेक्षेपेक्षा कमी झाले असले तर राष्ट्रीय उत्पादनात यांचीही भूमिका महत्वाची होती.

संपूर्ण हंगामाचा अंदाज

NFCSF ने संपूर्ण 2025–26 साखर हंगामासाठी 31.5 मिलियन टन उत्पादनाचे अंदाज वर्तवला आहे. यात सुमारे 3.5 मिलियन टन साखरेचा इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्जनला सामील केलेले नाही. जर सध्याचा वेग कायम राहिला तर देशातील साखरेचे प्रमाण मजबूत राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे घरगुती बाजारातील किंमतीवर दबाव कमी राहू शकतो. आणि इथेनॉल ब्लेंडिंगच्या योजनेलाही समर्थन मिळेल. एकूण हंगामाच्या मजबूत सुरुवातीमुळे साखरेचा उद्योगाला दिलासा मिळाला आहे. येत्या काही महिन्यात उत्पादनाचे आकडे बाजार आणि धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वाचे संकेत देणारे असतील.