Hariyana : मालिकेत काम मिळवून देतो सांगत आधी मैत्री केली, नंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

5 डिसेंबरला आरोपी तरुणीला घेऊन फरीदाबाद एनआयटी परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये आला. मुलीची तब्येत थोडी खराब झाल्यावर आरोपीने तिला गोळी दिली, त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार करून पळ काढला.

Hariyana : मालिकेत काम मिळवून देतो सांगत आधी मैत्री केली, नंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 12:37 AM

हरियाणा : आधी टीव्ही मालिकेत काम आश्वासन आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरिदाबाद पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली आहे. अमृत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.

आरोपीने तरुणीला मालिकेत काम देण्याचे आश्वासन दिले

आरोपी अमृत हा बिहारचा तर पीडित तरुणी प्रयागराज येथील रहिवासी आहे. सहा वर्षांपूर्वी अमृत आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. यावेळी त्याने पीडितेला आपण फिल्म निर्माता असल्याचे तरुणीला सांगितले. तसेच तिला मालिकेत काम मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. पीडितेनेही आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला

अमृतच्या सांगण्यावरून तरुणी 2 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीत आली. दिल्लीत आल्यानंतर आरोपीने तरुणीची भेट घेऊन तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आरोपीने तरुणीला सांगितले की, त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे आणि त्यासाठी तो तिच्या घरच्यांशीही बोलणार आहे. आरोपीच्या जाळ्याच फसत तरुणीनेही लगेच हो म्हटलं. 5 डिसेंबरला आरोपी तरुणीला घेऊन फरीदाबाद एनआयटी परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये आला. मुलीची तब्येत थोडी खराब झाल्यावर आरोपीने तिला गोळी दिली, त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार करून पळ काढला. दुसऱ्या दिवशी तरुणीने आरोपीला फोन केला असता त्याने फोन उचलणे बंद केले आणि मुलीचा नंबर ब्लॉक केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार

आपल्यासोबत झालेली ही फसवणूक तरुणीच्या लक्षात येताच तिने 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, स्टेशन प्रभारी हुकुम चंद यांनी महिला निरीक्षक रितू यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले आणि आरोपीला पकडण्यासाठी डेहराडूनला पाठवले. पोलीस पथकाने आरोपीला डेहराडून, उत्तराखंड येथून अटक करीत त्याची कारागृहात रवानगी केली. (a young woman was raped on the promise of marriage in hariyana)

इतर बातम्या

Osmanabad Crime: उस्मानाबादमध्ये क्राईम पेट्रोल पाहून चिमुरड्याची हत्या; नेमकी का केली हत्या? वाचा सविस्तर

Fake Loan Apps : काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.