जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद आधारकार्ड ठेवणार ; UIDAI च्या नवी योजना…

UIDAI ने आता जन्म आणि मृत्यू डेटा आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद आधारकार्ड ठेवणार ; UIDAI च्या नवी योजना...
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 3:01 PM

नवी दिल्लीः सध्याच्या काळात भारतामध्ये आधारकार्ड अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज ठरत आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची आता गरज वाटू लागली आहे. सरकारी कामापासून ते बॅकिंग आणि इतर कामासाठीही आधारकार्ड सक्तीचे झाले आहे. त्यामुळे आधारकार्डमधील आपली माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून आधारकार्डबाबत संबंधित सर्व प्रकारची अपडेट वेळोवेळी दिली जात ​​असते. त्यामुळे आता UIDAI आधारशी संबंधित आणि फसवणूक थांबवण्यासाठी एक चांगली योजना आणली जात आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आता जन्म आणि मृत्यू डेटा आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अंतर्गत, आता नवजात बालकांना तात्पुरता आधार क्रमांक दिला जाणार असून नंतर तो बायोमेट्रिक डेटासह अपग्रेडही केला जाणार आहे. एवढेच नाही तर मृत्यूची नोंदही आधारशी जोडली जाणार आहे. त्यामुळे आधार क्रमांकांचा होणारा गैरवापर रोखता येणार आहे.

म्हणजेच आता प्रत्येक व्यक्तीचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा डेटा बेसमध्ये जोडला जाणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे की, ‘जन्मा झाल्यानंतर तात्काळ आधार क्रमांकाचे वाटप केल्यास मुलाला आणि कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शंभर टक्के खात्री असणार आहे.

यामुळे सामाजिक लाभा आणि योजनांपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे, मृत्यू डेटाशी आधार लिंक केल्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेचा गैरवापरही टाळता येणार आहे.

आता अशी अनेक प्रकरणे समोर आली असून ज्यामध्ये लाभार्थीच्या मृत्यूनंतरही त्याचा आधारकार्ड वापरुन गैरवापर केला जात आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी वेळोवेळी योजना आणल्या जात असतात. आता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून झिरो आधार कार्ड वाटप करण्याचा विचार केला जात आहे.

त्यामुळे बनावट आधार क्रमांक तयार होणार नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारची फसवेगिरीह होणार नाही. त्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त आधार क्रमांकाचे वाटप करताच येणार नाही. ज्यांच्याकडे जन्म, वास्तव्य किंवा उत्पन्नाचा कोणताही पुरावा नाही अशा लोकांना झिरो आधार क्रमांक दिला जात असतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.