AAP: केजरीवालांच्या आपचा आणखी एक डाव, पंजाबमधून दोन पद्मश्री थेट राज्यसभेवर, गुजरातवर डायरेक्ट इफेक्ट?

निवडणूक आयोगाने पंजाबमधील राज्यसभा सदस्यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे. तर 10 जून रोजी मतदान होणार आहे. तर 13 जूनपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

AAP: केजरीवालांच्या आपचा आणखी एक डाव, पंजाबमधून दोन पद्मश्री थेट राज्यसभेवर, गुजरातवर डायरेक्ट इफेक्ट?
पर्यावरणप्रेमी पद्मश्री संत बलबीर सिंग, समाजसेवक पद्मश्री विक्रमजीत सिंग साहनीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:52 PM

पंजाब : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आम आदमी पक्षाच्या कार्याच्या जोरावर दिल्ली काबीज केली. तर त्यांच्या पक्षाने पाच राज्यात झालेल्या निवडणूकीच आपला जलवा दाखवत सगळ्यांनाच आश्नर्यात टाकले होते. त्यावेळी पहिल्यांदाच दिल्ली बाहेर पडत गोव्यासह पंजाबमध्ये नशीब आजमावले होते. त्यात त्यांना गोव्यात दोन सिटा मिळाल्या. तर पंजाबमध्ये सत्ताच त्यांच्या आप पक्षाला मिळाली होती. त्यामुळे राज्यसभेत त्यांची राजकीय ताकद वाढणार हे सिद्ध झाले होते. त्यानंतर आता राज्यसभेसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) घोषित झाली असून आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आपने दोन पद्मश्री पुरस्कार विजेत्यांनाच (Padma Shri Award Winners)  राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित केले आहे. यामध्ये पर्यावरणप्रेमी पद्मश्री संत बलबीर सिंग सिंचेवाल आणि पंजाबी संस्कृतीशी संबंधित समाजसेवक पद्मश्री विक्रमजीत सिंग साहनी यांच्या नावाचा समावेश आहे. खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी या नावांची घोषणा केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून लिहिले की, ‘मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की आम आदमी पार्टी दोन पद्मश्री पुरस्कार विजेत्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकित करत आहे. एक पर्यावरण प्रेमी पद्मश्री संत बलबीर सिंग सीचेवाल, तर दुसरे पद्मश्री विक्रमजीत सिंग साहनी पंजाबी संस्कृतीशी संबंधित आहेत. दोघांनाही माझ्या शुभेच्छा. उल्लेखनीय आहे की संत बलबीर सिंग सीचेवाल दीर्घकाळापासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. तर विक्रमजीत साहनी हे त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जातात.

दोन सदस्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपणार

त्याचवेळी पंजाबमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार असल्याने दोन्ही जागांवर आम आदमी पक्षाची माघार जवळपास निश्चित झाली आहे. राज्यातील दोन राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. राज्यसभा सदस्य अंबिका सोनी (काँग्रेस) आणि बलविंदर सिंग भूंदर (शिरोमणी अकाली दल) यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंजाबमधून संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे

निवडणूक आयोगाने पंजाबमधील राज्यसभा सदस्यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे निश्चित केली आहे. तर 10 जून रोजी मतदान होणार आहे. तर 13 जूनपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. यापूर्वी, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगसह आम आदमी पक्षाचे पाच उमेदवार मार्चमध्ये पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.