सर्व्हेंचे आकड्यांवरुन घमासान, पुढची 5 वर्ष देशाची सूत्रं कुणाच्या हाती जाणार
Loksabha election : लोकसभेचा निकाल लागण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. पण त्याआधीच जोरदार घमासान सुरु आहे. दोन्ही बाजुने आपलीस सत्ता येणार असा दावा केला जात आहे. अनेक सर्व्हेमध्ये काही तफावती देखील आढळल्या आहेत. त्यामुळे नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरुनच संभ्रम तयार झालाय.

देशाचं सत्ताकारण ठरवणाऱ्या दिवसाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. उद्या याच वेळेपर्यंत पुढची ५ वर्ष देशाची सूत्रं कुणाच्या हाती जाणार याचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. त्याआधी नेत्यांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रात पवारांबरोबर-शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात सर्व्हेंचे आकडयांवरुन घमासानही रंगलंय. निकालाला काही तास उरलेले असताना सर्व्हेंवरुन जोरदार चर्चा झडतायत. काही सर्व्हेमध्ये कोणत्या राज्यात कुणाला किती जागा मिळणार., याबाबतच्या अंदाजात मोठा फरक देखील आहे.
इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेत उत्तर प्रदेशातल्या 80 जागांवर भाजप आघाडी 62 ते 72 तर इंडिया आघाडीला फक्त 8 ते 12 जागांचा अंदाज वर्तवला गेलाय. तर झी न्यूज एआयच्या सर्व्हेत भाजप आघाडीला 52 ते 58, इंडिया आघाडीला 22 ते 26 तर इतरांना एका जागेचा अंदाज आहे.
बिहारमध्ये या सर्व्हेनुसार 40 जागांपैकी भाजप आघाडीला 29 ते 33 जागा, आणि काँग्रेस आघाडीला 7 ते 10 जागा मिळू शकतात. दुसरा सर्व्हे सांगतोय की बिहारमध्ये भाजप आघाडीला 15 ते 25 आणि काँग्रेस आघाडी सुद्दा 15 ते 25 च्या अंदाजानं बरोबरीत आहे.
राजस्थानच्या 25 जागांपैकी एका सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 16 ते 19 आणि काँग्रेस आघाडीला 5 ते 7 जागांचा अंदाज आहे. इतरांना 1 ते 2 जागा मिळू शकतात. दुसऱ्या सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 15 ते 19 तर काँग्रेस आघाडीला 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेत दिल्लीतल्या ७ जागांपैकी भाजप आघाडीला ६ ते सर्वच्या सर्व ७ जागा मिळू शकतात. तर झी न्यूज एआयच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 2 ते 4 आणि इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ईकडच्या सर्व्हेनुसार कर्नाटकच्या 28 जागांपैकी भाजप आघाडीला 23 ते 25, तर काँग्रेस आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात. झी न्यूज एआयच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात भाजप आघाडीला 10 ते 14 आणि काँग्रेस आघाडीला 12 ते 20 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रात या सर्व्हेनुसार महायुतीला 28 ते 32, मविआला 16 ते 20 जागांचा अंदाज वर्तवला जातोय., तर एआयच्या सर्व्हेत महायुतीला 26 ते 24 आणि मविआला 15 ते 21 जागांचा अंदाज आहे.
अॅक्सिस माय इंडियानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीला 26 ते 31, ममता बॅनर्जींना 11 ते 14 जागांचा अंदाज आहे….. एआयच्या सर्व्हेत भाजप आघाडीला 20 ते 24 आणि ममता बॅनर्जींनी 16 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
या बाजूच्या सर्व्हेत गुजरातच्या 26 जागांपैकी भाजप आघाडीला 24 किंवा 26 पैकी 26 जागांचा अंदाज आहे., तर काँग्रेस आघाडीला 0 ते 1 जागा मिळू शकतात. दुसरीकडे एआयच्या सर्व्हेत भाजपला 20 ते 26 आणि काँग्रेस 2 ते 4 जागांचा अंदाज आहे.
एका सर्व्हेत आंध्र प्रदेशच्या 25 जागांपैकी भाजप आघाडीला 21 ते 23, काँग्रेसला शून्य आणि जगनमोहन रेड्डींना 2 ते 4 खासदार मिळू शकतात. तर या सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 12 ते 16, काँग्रेस आघाडीला 2 ते 4 आणि जगनमोहन रेड्डींना 6 ते 10 जागांचा अंदाज आहे.
ओडिशात 21 जागांपैकी अॅक्सिस इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजप 18 ते 20, पटनायकांच्या बीजेडीला 0 ते 2 आणि काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळू शकते. मात्र एआयच्या सर्व्हेनुसार ओडिशात भाजपला 10 ते 14, काँग्रेस आघाडीला 4 ते 6 आणि पटनायकांच्या बीजेडीला 3 ते 5 जागांचा अंदाज आहे.
देशपातळीवर सर्व्हेंवरुन घमासान सुरुय आहे आणि एनडीएसहीत इंडिया आघाडीचे नेतेही आपल्या विजयचा विश्वास व्यक्त करत आहेत देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही निकालाआधीच्या सर्व्हेवरुन दावे-प्रतिदावे रंगत आहेत.
