आदि सेवा पर्व संपन्न – ‘आदिवासी गाव व्हिजन २०३०’ ऐतिहासिक ठरणार
जगातील सर्वात मोठे आदिवासी नेतृत्व अभियाना अंतर्गत ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १ लाख गावे आणि वाड्यांमधील ११५ दशलक्ष नागरिकांना सक्षम बनवण्यात आले आहे. एक लाख गावात व्हिजन डॉक्युमेंट आणि आदिवासी सेवा केंद्रांची निर्मिती प्रगतीपथावर आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘आदिवासी गौरव वर्ष’ म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. या ऐतिहासिक उत्सवांतर्गत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने “आदि कर्मयोगी अभियान”ची सुरुवात केली आहे. हा जगातील सर्वात मोठी आदिवासी नेतृत्व मोहिम आहे. त्यामध्ये ३० राज्य-केंद्रशासित प्रदेशांतील १ लाख गाव आणि पाड्यातील ११.५ कोटींहून अधिक आदिवासी नागरिक जोडले गेले आहेत. या मोहिमेची औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मध्य प्रदेशातील धार या गावात केले आहे.
“आदि सेवा पर्व”चा केंद्र बिंदु – ट्रायबल व्हिलेज व्हीजन २०३०
२ ऑक्टोबर २०२५ रोजी आदिवासी गावांनी आणि वाड्या-वस्त्यांनी विशेष ग्रामसभांमध्ये या “आदिवासी गाव व्हिजन २०३०” निर्णयाला पारित केले तेव्हा एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली गेली.२०४७ च्या विकसित भारताचे ध्येय्य पूर्ण करण्यासाठी ग्राम सभांच्या या सहभागात्मक प्रक्रियेमुळे प्रत्येक आदिवासी समुदाय पुढील दशकांसाठी स्वतःच्या विकास प्राधान्यक्रम देण्याचा निर्णय घेणार आहे.
या मोहिमेंतर्गत १ लाख गावात व्हिजन दस्तावेज आणि ‘आदि सेवा केंद्र’ निर्माण होणार आहेत.
व्हिजन २०३० ची प्रमुख वैशिष्ट्ये
🔹 समुदाय आधारित विकास: ट्रांसेक्ट वॉक, केंद्रित समूह चर्चा (FGDs) आणि गॅप विश्लेषणाच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखण्यात आल्या.
🔹 गावपातळीवरील प्राधान्यक्रम: शिक्षण, आरोग्य, उपजीविका, सामाजिक आणि आर्थिक समावेशन, आणि पायाभूत सुविधांमध्ये ठोस लक्ष्ये निश्चित करण्यात आली. 🔹 सरकारी योजनांमध्ये समन्वय: PM JANMAN, धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान २.० आणि अन्य योजनांनुसार कामे जुळवणे.
🔹 संस्थात्मक यंत्रणा: प्रत्येक गावात एका ‘आदि सेवा केंद्र’ची स्थापना – एक खिडकी नागरिक सेवा केंद्र, ज्यात प्रत्येक गावकरी १ तास सेवा ( आदि सेवा वेळ ) देईल
🔹 तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन: AI-सक्षम ‘आदि वाणी’ ऐपच्या माध्यमातून अधिकारी आणि समुदायादरम्यान वास्तविक वेळआधारित संवाद ( मूळ भाषेत होणार )
सहभाग पातळी (Adi Karmayogi Portal वर अपलोड डेटानुसार):
सुमारे ३०० जिल्हे,
४६,०४० गावे ,
७८ लाख+ सहभागी व्हिजन २०३० प्रक्रियेत सामील
७.५ लाख+ आदि साथी आणि सहकारी सक्रिय
या कालावधीत २३ लाख लाभार्थ्यांना व्यक्तीगत ओळखपत्र उदा. आधार, आयुष्यमान भारत, पीएम किसान, पीएम जनधन आधी वितरित केले गेले
प्रशासनाची पुनर्कल्पना – एक तळागाळातील नेतृत्व मॉडेल
१० जुलै २-२५ पासून आतापर्यंत २० लाख वरिष्ठ अधिकारी, स्वयं सहायता समूहाच्या महिला आणि आदिवासी युवक, ७ -दिवसीय 10 जुलाई 2025 से अब तक, 20 लाख वरिष्ठ अधिकारी, स्वयं सहायता समूह की महिलाएं व जनजातीय युवा, 7-दिवसीय निवासी “शासन प्रक्रिया प्रयोगशाळा” माध्यमातून ‘आदि कर्मयोगी’रुपात प्रशिक्षित केले गेले.
हे कर्मयोगी सक्षम आहेत :
✔️ सरकारी योजनांची शेवटच्या व्यक्तीपर्यंत डिलीव्हरी सुनिश्चित करणे
✔️ विभागीय संसाधनात समन्वय वाढवण्यात
✔️ आदिवासी समुदायांना प्रशासनात भागीदार बनवण्यात
आदि कर्मयोगी मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये
२० लाख प्रशिक्षित परिवर्तनकर्ता – अधिकारी, महिला आणि युवा
१ लाख गाव, १ व्हिजन – ट्रायबल व्हिलेज व्हिजन २०३० ला स्वीकारले गेले
१ लाख आदि सेवा केंद्र – साप्ताहिक “आदि सेवा समय” सह सेवा केंद्र
गाव आधारित तक्रार निवारण – वेळेवर निराकरण आणि योजनांचा व्याप्ती
प्रभावाची पातळी:
📍 ११.५ कोटी आदिवासी नागरिक सशक्त 📍१ लाख गाव • ३० राज्य/केंद्रशासित प्रदेश • ५५० जिल्हे • ३,००० ब्लॉक 📍 20 लाख आदि कर्मयोगी – तळागाळातील नेतृत्व
प्रमुख वक्तव्यांची झलक:
🗣️ जुएल उरांव, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री:
‘व्हिजन २०३० ला स्वीकारणे आदिवासी समुदायांसाठी एक परिवर्तनकारी क्षण आहे. हे पाऊल गावांना त्यांचा विकास मार्ग स्वत: निश्चित करण्याचा संधी देत आहे. ज्यामुळे प्रशासन मजबूत आणि सहभागी बनते’
🗣️ दुर्गादास उइके, राज्य मंत्री, आदिवासी व्यवहार मंत्रालय:
‘आदि सेवा केंद्रांची स्थापना आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सेवा वितरणाचा चेहरा बदलत आहे.योजना आता ग्रामसभा, टांसेक्ट वॉक आणि FGD सारख्या प्रयत्नांमुळे प्रत्येक दारापपर्यंत पोहचत आहेत’
🗣️ विभु नायर, सचिव, आदिवासी व्यवहार मंत्रालय:
‘ट्रायबल व्हिलेज व्हिजन २०३० सहभाग आणि उत्तरदायीत्व शासनाचे ऐतिहासिक पाऊल आहे. AI-सक्षम आदि वाणी ऐप सारख्या तंत्रज्ञानामुळे आम्ही पारदर्शकता आणि लोकशाहीला जमीनीपातळीवर मजबूत करत आहोत’
विकसित भारत @२०४७ च्या दिशेने
आदि कर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून समुदायाची भागीदारी, तरुणांचे नेतृत्व, आणि उत्तरदायी प्रशासन – हे सर्व आदिवासी नागरिकांना भारताच्या विकास यात्रेत सह-निर्माता बनवत आहेत. हे पाऊल एक सर्वसमावेशक, लवचिक आणि समृद्ध राष्ट्र निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
