‘आदिशपथ’उपक्रमाचे दिल्लीत आयोजन, आदिवासी समाजाच्या विकासावर झाली चर्चा
आदिवासी कार्य मंत्रालयाने 21 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये 'आदि शपथ' या उपक्रमाच्या सत्राचे आयोजन केले होते.

आदिवासी कार्य मंत्रालयाने 21 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘आदि शपथ’ या उपक्रमाच्या सत्राचे आयोजन केले होते. देशभरात आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या उपक्रमावर अर्धदिवसीय संवाद सत्र पार पडले. या खास सत्रात दिल्ली-एनसीआरमधील सार्वजनिक क्षेत्रात काम कंपन्या, देणगी संस्थांसह 20 हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला होता.
हा उपक्रम आदिवासी खेड्यांमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि त्या भागाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा यासाठी राबविला जात आहे. यात CSR देणगीदार, स्वयंसेवी संस्था, द्विपक्षीय व बहुपक्षीय संस्था यांचा सहभाग होता. आदिवासी विकास मंत्रायलाचे भविष्यातील योजनांची माहिती याद्वारे देण्यात आली.
राजधानी दिल्लीतील या खास सत्रात विविध संस्थांच्या आदिवासी भागांतील चालू प्रकल्पांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच एकमेकांच्या समन्वयाने काम करण्याचं महत्त्व काय असते ते अधोरेखित करण्यात आलं. विविध संस्थांनी आपले प्रकल्प आणि योजनांचा माहिती देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ तयार करण्यात यावे अशी मागणी केली.
या सत्रात विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यांनी आदिवासी मंत्रालयासोबत काम करण्याची आणि मंत्रालयाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. अनेक कंपन्यांनी त्यांचे प्रकल्पाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि संस्कृतीचे जतन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
या सत्राला टी. रौमुआन पैते संयुक्त सचिव, आदिवासी कार्य मंत्रालय. NSTFDC चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि श्री अनंत प्रकाश पांडे आणि आदिवासी कार्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर ऑइल इंडिया, हुडको, गेल, टाटा ट्रस्ट, गेट्स फाउंडेशन, अमेरिकन इंडियन फाउंडेशन, एचसीएल टेक्नोलॉजी, भारती एअरटेल आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधीही या सत्राला हजर होते.
