AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explain : बालाकोटनंतर आता 2025 मध्ये IAF ची ताकद काय आहे? पाकिस्तानला कसा झटका मिळेल, ते समजून घ्या

Pahalgam Terror Attack : सहावर्षांपूर्वी 2019 साली इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात घुसून बालकोट येथे एअर स्ट्राइक केला होता. आता 2025 साली सीमेवर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या सहावर्षात इंडियन एअर फोर्सची ताकद किती वाढली आहे? पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर मिळेल? त्यासाठी एकदा हे वाचा.

Explain : बालाकोटनंतर आता 2025 मध्ये IAF ची ताकद काय आहे? पाकिस्तानला कसा झटका मिळेल, ते समजून घ्या
indian air force
| Updated on: Apr 26, 2025 | 11:00 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या सीमेवर प्रचंड तणाव आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निर्दोष पर्यटकांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. त्यामुळे भारतात प्रचंड संताप आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची, बदला घेण्याची मागणी होत आहे. पहलगाम हल्ल्यामागच्या एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही, हे भारताने स्पष्ट केलय. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारताने पहिला स्ट्राइक केला आहे. पण त्यानंतर भारताच पुढचं पाऊल काय असेल? या चिंतेमध्ये पाकिस्तान आहे. पाकिस्तानने जे केलय, त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसात ‘आक्रमण’ नावाचा एका युद्धाभ्यास झाला. असे अनेक युद्ध सराव नेहमीच होत असतात. पण ‘आक्रमण’ युद्ध सरावाचा टायमिंग आणि त्यामागचा अर्थ खूप वेगळा आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे.

भारताची पहिल्या फळीची फायटर विमानं राफेल, सुखोई-MKI 30 ‘आक्रमण’ युद्धाभ्यासात उतरवण्यात आली होती. भारताचे टॉप पायलट्स या युद्धसरावात सहभागी झाले होते. पाकिस्तान बरोबर मोठा तणाव असताना नौदलाने सुद्धा त्यांच्या तयारीच प्रात्यक्षिक दाखवलं. हा नियमित युद्ध सराव असल्याच सांगितलं जात असलं, तरी मोठ्या युद्धासाठी तुम्ही कितपत तयार आहात? ते यातून लक्षात येतं. म्हणून ‘आक्रमण’ युद्ध सराव विशेष महत्त्वाचा ठरतो.

ग्राऊंड स्ट्राइकचा अभ्यास

‘आक्रमण’ युद्ध सरावात IAF च्या वैमानिकांनी डोंगराळ भागासह वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवर ग्राऊंड स्ट्राइक म्हणजे जमिनीवरील टार्गेट्सना उद्धवस्त करण्याचा अभ्यास केला. राफेल, सुखोईची स्क्वाड्रन्स यामध्ये सहभागी झाली होती. पूर्वेकडून तसेच वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन फायटर जेटसह IAF ची साधन सामुग्री हलवण्यात आली होती. त्यावरुन ‘आक्रमण’ युद्धाभ्यास किती मोठा होता, ते लक्षात येतं. शत्रूच्या प्रदेशात खोलवर हल्ला करणं, दूरवरची टार्गेट अचूकतेने उद्धवस्त करणं, अशा कवायतींचा या ड्रीलमध्ये समावेश होता. इंडियन एअर फोर्सच्या वरिष्ठांच्या देखरेखीखाली हा युद्ध सराव पार पडला.

S-400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम आहे

2019 साली बालाकोट एअर स्ट्राइकच्या दुसऱ्यादिवशी भारतीय फायटर विमानांची पाकिस्तानी फायटर जेट्ससोबत काश्मीरच्या आकाशात डॉगफाइट झाली होती. यावेळी भारताने पाकिस्तानच एक F-16 पाडलं होतं. आता सहावर्षांनी IAF ची ताकद अधिक वाढली आहे. आज भारताकडे राफेलच्या रुपाने 4.5 जनरेशनच फायटर विमान आहे, त्याशिवाय S-400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूच मिसाइल, फायटर विमान पाडण्याची S-400 ची क्षमता आहे. या तणाव पूर्ण परिस्थितीत भारतीय नौदलाची डिस्ट्रॉयर INS सूरतने जमिनीवरुन हवेतल्या लक्ष्याचा वेध घेणाऱ्या सिस्टिमची यशस्वी चाचणी केली. भारताची संरक्षण क्षमता 2019 च्या तुलनेत अधिक अत्याधुनिक बनली आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.