AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolkata Bulldozer Action : पश्चिम बंगालमध्ये खुन्नसच्या राजकारणाला सुरुवात, बुलडोझर आणून..VIDEO

Kolkata Bulldozer Action : "दुकान बंद केल्यानंतर काही वेळातच आग लागल्याची माहिती मिळाली. परत येऊन पाहिलं तर पक्ष कार्यालयाला आगीच्या ज्वाळांनी घेरलेलं. ही आग पसरत चाललेली"

Kolkata Bulldozer Action : पश्चिम बंगालमध्ये खुन्नसच्या राजकारणाला सुरुवात, बुलडोझर आणून..VIDEO
post poll violence in west Bengal
| Updated on: May 06, 2026 | 8:39 AM
Share

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आसनसोल उत्तर विधानसभा क्षेत्रात कोर्ट मोडवर असलेलं तृणमुल काँग्रेसचं कार्यालय रात्री उशिरा पेटवून देण्यात आलं. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तृणमुल काँग्रेसच्या वॉर्ड नंबर 53 च्या नगरसेविका मौसमी बोस यांचं हे कार्यालय होतं. आगीत हे पक्ष कार्यालय जळून खाक झालं. जवळच्या एका दुकानाचं सुद्धा नुकसान झालय. आसनसोल फायर ब्रिगेडच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. आसनसोल उत्तर भाजपचे आमदार कृष्णेंदु मुखर्जी यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, “मला नगरसेविकाने या घटनेबद्दल सांगितलं. माझ्या कार्यालयाने लगेच या बद्दल फायर ब्रिगेड आणि पोलिसांशी संपर्क साधला. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल. निवडणुकीनंतर होणारा कुठलाही हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही”

आसनसोलमधील स्थानिक दुकानदार हरेकृष्ण बॅनर्जी यांनी सांगितलं की, “दुकान बंद केल्यानंतर काही वेळातच आग लागल्याची माहिती मिळाली. परत येऊन पाहिलं तर पक्ष कार्यालयाला आगीच्या ज्वाळांनी घेरलेलं. ही आग पसरत चाललेली. या आगीमुळे दुकानाच्या इलेक्ट्रीसिटीचं नुकसान झालं” ही आग लागण्यामागचं कारण अजून समजलेलं नाही. मंगळवारी रात्री कोलकातामधील ऐतिहासिक हॉग मार्केट भागातील तृणमुल काँग्रेसचं कार्यालय काही लोकांनी बुलडोझरने पाडलं. त्यानंतर या भागात तणाव निर्माण झालेला. या घटनेने दुकानदारांमध्ये दहशत पसरली. त्यांना अचानक आपली दुकानं बंद करावी लागली.

स्थानिक दुकानदार टेन्शनमध्ये आले

न्यू मार्केट भागातील टीएमसीचं यूनियन ऑफिस मुख्य टार्गेट होतं. ते पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आलं. या भागात तोडफोड झाल्याने गडबड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्याचे फोटो वेगाने पसरले. स्थानिक दुकानदार टेन्शनमध्ये आले. कोलकातामधील हा व्यस्त, वर्दळीचा भाग आहे. तिथे परिस्थिती बिघडल्याने घाबरलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानांचे शटर ओढून घेतले.

‘हीच भाजपं आहे’

न्यू मार्केट भागात झालेला हा हिंसाचार आणि बुलडोजर एक्शनवर टीएमसी खासदार महुआ मोइत्र यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला. ‘कोलकाताचं ऐतिहासिक न्यू मार्केट, बंगाली परिवर्तनाचा आनंद घेत आहेत’ असं त्यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. सरकारी देखरेखीखाली ही तोडफोड झाली असा आरोप तृणमुलचे वरिष्ठ नेते डेरेक ओ ब्रायन यांनी केली. “मध्य कोलकातामधील न्यू मार्केट परिसरात पोलिसांच्या अनुमतीने विजयाचं सेलिब्रेशन म्हणून मीटची दुकानं पाडण्यासाठी एक बुलडोजर आणला. CAPF चे जवान आसपास उभे होते. हीच भाजपं आहे, जगाने हे फोटो पहावे” असं डेरेक ओ ब्रायन यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!