अमेरिकेवर आता नवं संकट, देशभरात भीतीचं वातावरण, बसणार मोठा दणका, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दुप्पट टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दुप्पट टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. भारताचा देखील आता त्या देशांमध्ये समावेश झाला आहे, ज्या देशांवर अमेरिकेनं सर्वाधिक टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. मात्र आता ट्रम्प यांचं हे टॅरिफ अस्त्र त्यांच्यावरच उलटल्याचं पहायला मिळत आहे.
अमेरिकेची सध्याची परिस्थिती अशी आहे की, तेथील सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला होता, मात्र तो आता दुप्पट झाला आहे, म्हणजे भारतीय वस्तूंवर आता अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावताना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आता याचा मोठा फटका हा अमेरिकेलाच बसत असल्याचं दिसून येत आहे. सिएनएनच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकन कंपन्या आणि तेथील ग्राहक हे पहिल्यापासूनच ट्रम्प यांनी इतर देशांवर लावलेल्या टॅरिफचा मार सहन करत आहेत. त्यातच आता भारताच्या उत्पादनावर देखील 50 टक्के टॅरिफ लावण्यात आल्यानं अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तज्ज्ञांच्या मतानुसार ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत महागाई तर वाढेलच मात्र त्याचबरोबर त्याचा परिणाम तेथील रोजगारावर देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
भारत अमेरिकेला औषधं, स्मार्टफोनचे उपकरण आणि कपडे यांची प्रामुख्यानं निर्यात करतो. गेल्या दहा वर्षांमध्ये भारताचा अमेरिकेसोबत व्यापार दुपटीने वाढला आहे. 2023 मध्ये भारतानं अमेरिकेकडून 87 डॉलर अब्ज रुपयांचं सामान आयात केलं होतं, तर अमेरिकेला 47 अब्ज डॉलर रुपयांचं सामान निर्यात केलं होतं. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम हा आता अशा अमेरिकन कंपन्यांवर देखील पडणार आहे, ज्यांनी चीनमधील आपले प्रोजेक्ट बंद करून भारतात सुरू केले होते.
