AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्धविरामानंतर इस्त्रायलचा भीषण हल्ला, थेट 50 फायटर जेट मैदानात, एकाचवेळी 160 बॉम्ब हल्ले, अनेकांचा मृत्यू

युद्धविरामाची घोषणा होऊन अवघे 24 तास होत नाहीत तोच आता इस्त्रायलकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. 50 फायटर जेटने 160 बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! युद्धविरामानंतर इस्त्रायलचा भीषण हल्ला, थेट 50 फायटर जेट मैदानात, एकाचवेळी 160 बॉम्ब हल्ले, अनेकांचा मृत्यू
इस्त्रायलचा मोठा हल्ला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 10:27 PM
Share

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, अखेर युद्धाच्या 40 व्या दिवशी युद्धविराम झाला आहे. बुधवारी इराण आणि अमेरिकेकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने देखील अमेरिकेला समर्थन देताना युद्धविराम झाल्याचं सांगितलं. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्याच्या युद्धविरामाला मान्यता देण्यात आली. या दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज तातडीने खुला करावा अशी अट अमेरिकेनं इराणसमोर ठेवली होती. इराणने ती अट देखील मान्य केली आहे. दरम्यान या युद्धविरामासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता.

युद्धविराम होऊन अजून 24 तास देखील झाले नाहीत, तोच आता मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने जेव्हा इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा त्यामध्ये इस्त्रायल लेबनॉनवर देखील हल्ले करणार नाही, अशी एक अट होती. मात्र इस्त्रायलने पाकिस्तानची ही अट फेटाळून लावली आहे. आमचा युद्धविराम हा फक्त इराणशी आहे, आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असं इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं होतं. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच इस्त्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलने 50 फायटर जेटच्या मदतीने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे. यावेळी इस्त्रायलकडून तब्बल 160 बॉम्ब हल्ले करण्यात आले असून, हिज्बुल्लाहाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं. इस्त्रायलच्या या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक हिज्बुल्लाह संघटनेचे सदस्य मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये लेबनॉनचे अनेक सामान्य नागरिक मारले गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता की, आता लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या हल्ल्याविरोधात आपल्या मित्र राष्ट्रांची मदत मागितली आहे. आम्ही युद्धविरामाचं स्वागत करतो, परंतु इस्त्रायलचे आमच्यावर हल्ले सुरूच आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी आम्हाला मदत करा असं साकडं आता लेबनॉनच्या पंतप्रधानांनी आपल्या मित्र राष्ट्रांना घातलं आहे, तर दुसरीकडे इराणने देखील लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे, जर हल्ले थांबले नाहीत तर आम्ही युद्धविराम तोडू अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग