AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा, केली मोठी घोषणा

जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, जवानाच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर आता राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा, केली मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 5:02 PM
Share

जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.  यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह? 

दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

26 जणांचा मृत्यू 

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असून, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळेल,  दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ

दरम्यान जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली, जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून हल्ल्याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.