AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचे नाव काय? किती होता अनुभव? वाचा…

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादजवळ कोसळले आहे.या विमानाचा पायलट कोण होता? त्याला किती अनुभव होता याबाबत माहिती जाणून घेऊयात.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचे नाव काय? किती होता अनुभव? वाचा...
air india plane crash
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 12, 2025 | 3:33 PM
Share

गुजरातमधील अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळातडे जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादजवळ कोसळले आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण २४२ प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र काही जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानाचा पायलट कोण होता? त्याला किती अनुभव होता याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पायलटचे नाव काय? किती होता अनुभव?

समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातानंतर सगळीकडे धुराचे लोट पहायला मिळाले.

इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रहिवासी भागात कोसळलं विमान

लंडनला जाणारे विमान ज्या ठिकाणी हे कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

अपघातानंतर एअर इंडियाने काय म्हटलं?

अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर एअर इंडियाने एक ट्वीट केले आहे. यात कंपनीने म्हटले की, “अहमदाबादवरुन लंडनलाा जाणाऱ्या AI171 या विमानाचा आज १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आहे. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी