AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातात मृत्यू झालेल्या नर्सबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केरळमधील अधिकारी निलंबित

अहमदाबादमधील विमान अपघातात 250 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृत प्रवाशांमध्ये केरळमधील एका नर्सचाही समावेश होता. तिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

विमान अपघातात मृत्यू झालेल्या नर्सबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केरळमधील अधिकारी निलंबित
Keral Officer Suspended over Plane crash
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 13, 2025 | 4:46 PM
Share

अहमदाबादमधील विमान अपघातात 250 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. ज्यामध्ये विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृत प्रवाशांमध्ये केरळमधील एका नर्सचाही समावेश होता, ती नोकरीनिमित्त लंडनला जात होती. मात्र तिचा अपघातात मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याचे निलंबन 

अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नर्सचे नाव रंजिता असे आहे. ती केरळमधील रहिवासी आहे. तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्याबद्दल फेसबुकवर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल केरळमधील एका सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयातील कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन असे या निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पठाणमथिट्टा येथील रंजिता यांची खिल्ली उडवली होती. याची दखल राज्याचे महसूल मंत्री के राजन यांनी घेत ए पवित्रन यांच्या फेसबुक पोस्टचे वर्णन “अपमानजनक” असे केले आणि या अधिकाऱ्याला निलंबित केले.

ब्रिटनमध्ये करायची काम

दोन मुलांची आई असलेली रंजिता ही ब्रिटनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. काही काळ परदेशात राहिल्यानंतर ती केरळमधील सरकारी सेवेत पुन्हा रुजू होण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केरळमध्ये आली होती. मात्र लंडनला परत जाताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पुल्लाड येथील रंजिता यांच्या घरी पोहोचून तिच्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

गुरुवारी दुर्घटना घडली

गुरुवारी दुपारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानाला अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती या अपघातातून बचावला आहे.

Follow Us
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?