Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर भडकली AIMIM, हिंदुस्तानात नाही, मग काय आम्ही…
Eknath Shinde : नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली हे आपले बालेकिल्ले एकनाथ शिंदे यांनी अबाधित राखले. दुसऱ्याबाजूला मुंबईत त्यांनी 30 जागा जिंकून महापालिकेत प्रवेश केला.

महाराष्ट्रात निवडणुकीत मिळवलेल्या शानदार विजयानंतर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (AIMIM) मध्य प्रदेशात संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. खंडवा येथे आयोजित सदस्यता अभियाना दरम्यान AIMIM चे प्रदेश अध्यक्ष मोहसिन अली यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. AIMIM चा वाढता प्रभाव भारतासाठी धोकादायक आहे, असं एकनाथ शिंदे बोलले होते. त्यावर मोहसिन अली यांनी पलटवार केला. “आमचे युवक भारतात निवडणुका लढणार नाहीत, तर पाकिस्तानात जाऊन निवडणुका लढणार का?. ते हिंदुस्तानात जिंकणार नाही, तर बांग्लादेशात जिंकणार का? की, चीन, अफगाणिस्तानात जाऊन जिंकणार का?” असं AIMIM च्या मध्य प्रदेश प्रभारीने म्हटलं.
मोहसीन अली यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तिगत आणि राजकीय टीका सुद्धा केली. “एकनाथ शिंदे ते आहेत, ज्यांचे वेळेनुसार बाप बदलत जातात. एकवेळ बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळी ते काँग्रेसचा जोरदार विरोध करायचे. राजकीय फायद्यासाठी नंतर काँग्रेसला साथ दिली. काँग्रेस सोबत मिळून सरकार बनवलं. आज भाजपसोबत आहेत. भाजपसोबत सरकार बनवलय” अशी टीका मोहसीन अली यांनी केली.
मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं
AIMIM नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीय. “हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक जण हिंदुस्तानातच लढणार आणि हिंदुस्तानातच जिंकणार” असं मोहसीन अली यांनी म्हटलं. महाराष्ट्रात AIMIM ने मिळालेल्या विजयानंतर पार्टी प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आता मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रीत केलं आहे. खंडवा भागात सदस्यता अभियान राबवून AIMIM ला हा संदेश द्यायचा आहे की, राज्याच्या राजकारणातही ते मजबुतीने पायरोवून उभे राहू शकतात.
महायुतीचा महापौर बसणार
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली हे आपले बालेकिल्ले एकनाथ शिंदे यांनी अबाधित राखले. दुसऱ्याबाजूला मुंबईत त्यांनी 30 जागा जिंकून महापालिकेत प्रवेश केला. भाजपच्या साथीने त्यांनी मुंबई पालिकेची निवडणूक लढवली होती. आता महायुतीचा महापौर बसणार आहे.
