Air India Plane Crash : आप्तेष्टांशी संपर्क साधा…एअर इंडियाकडून आपत्कालीन नंबर जारी
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचामोठा अपघाता होऊन ते कोसळलं. त्यावेळी विमानात 242 प्रवासी होती. या अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

गुरूवारची दुपार संपूर्ण देशासाठी अत्यंत दु:खद ठरली.गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुपारी 1.30 च्या सुमारास लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथून एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केलं खर पण अवघ्या 10 मिनिटांतच हे विमान शहरातील नागरी वस्तीतील एक इमारतीला धडकून खाली कोसळलं आणि आगीचे लोळ उठले,प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एकच कल्लोळ माजला. यावेळी विमानात सुमारे 242 प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक आपत्कालीन संपर्क क्रमांक अर्थात हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइन क्रमांक 1800 5691 444 हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे असे एअर इंडियाने सोशल मीडिया साइट एक्स वरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तसेच अहमदाबाद एअरपोर्टचा हेल्पलाइन नंबरही समोर आला आहे , तो 07922869211 असा आहे.
अहमदाबादहून गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांन निघालेल्या बोइंग 787-8 या फ्लाईटमध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणि http://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती प्रसिद्ध करणार आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर भागात विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली,असे अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले . आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच एनडीआरएफच्या टीम , अनेक अँब्युलन्स, एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमी व होरपळलेल्या प्रवाशांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातस्थळी सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान अहमदाबाद विमानतळ सध्या बंद करण्यात आलां असून तेथून होणारी सर्व विमानांची उड्डाणं ही थांबवण्यात आली आहेत.
एअर इंडिया विमान अपघाताबद्दलचे अपडेट्स
– फ्लाईट क्रमांक एआय 171 ने दुपारी दीडच्या सुमारास वाजता अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले.
– फ्लाईटने उड्डाण करताच, पायलटने एटीसीला मेडे कॉल केला, परंतु त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही.
– 1 वाजून 39 मिनिटांनी मेघानी नगर परिसरातील मेंटल हॉस्पिटल कॅम्पसजवळ विमान कोसळले.
– लंडनच्या दिशेने निघालेले हे विमान टेकऑफ करताच अवघ्या 1 मिनिटांत खाली कोसळलं.
– विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 2 पायलट, 10 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते.
– हा विमान अपघात अहमदाबाद हॉर्स कॅम्पच्या निवासी भागात झाला.
– विमान अपघातात मोठे नुकसान तसेच जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
– विमानाच्या शेपटाचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
– अपघाताच्या पार्श्वभूमीवर मेहगनी नगरच्या आसपासचे रस्ते सील करण्यात आले आहेत.
– कॅप्टन सुमित सभरवाल हे विमानाचे मुख्य वैमानिक होते. त्यांना विमाने उडवण्याचा 8200 तासांचा अनुभव होता.
– त्याच वेळी, सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.
– धावपट्टी क्रमांक 23 वरून टेकऑफ केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या परिघाबाहेर जमिनीवर कोसळले.
– बोइंग 787-8 या फ्लाईटमध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
