Air India Plane Crash : ‘आम्हाला मदत करा’ पायलटचा इमर्जन्सी संदेश आला पण…विमान अपघाताची धक्कादायक माहिती समोर!
एअर इंडिया कंपनीच्या विमानाचा अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हे विमान थेट एका इमारतीवर आदळलं आहे. या दुर्घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दरम्यान, या विमानाच्या पायलटला अपघात होण्याची चाहूल लागली होती, असं समोर आलं आहे. त्याने एक आपत्कालीन संदेशही पाठवला होता, अशी माहिती डिजीसीएने दिलीय.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचे बोईंग 787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या विमानाने नियोजित वेळेनुसार हवेत उड्डाण घेतले होते. मात्र त्याआधीच या विमानात तांत्रिक बिघाड झाली आणि ते थेट जमिनीवर आले. या दुर्घटनेचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते.
एक आपत्कालीन संदेश पाठवला होता…
अहमदाबादच्या विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. या अपघातानंतर डीजीसीएने महत्त्वाची माहिती दिली आहे. हे विमान चालवणारे पायलट सुमित सभरवाल हे चांगले अनुभवी पायलट आहेत. त्यांना 8 हजार 200 तासांपेक्षा अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव आहे, असं डीजीसीएने म्हटलंय. तसेच अहमदाबाद विमानतळाच्या रनवे नंबर 23 वरून या विमानाने दुपारी 1.23 वाजता उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच 1.39 वाजता विमानाने एक आपत्कालीन संदेश पाठवला होता. पण त्यानंतर मात्र या विमानाशी संपर्क होऊ शकला नाही, असं डीजीसीएने सांगितले आहे.
संपर्क झाला असता तर…
डीजीसीएच्या या माहितीनंतर विमान चालवणााऱ्या पायलटला विमानात काहीतरी बिघाड आहे, असं समजलं होतं. त्यामुळेच हा मदतीसाठी हा आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला होता, असं म्हटलं जात आहे. या विमानाशी नंतर काही संपर्क झाला असता तर चित्र काही वेगळे असते अशीही भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आता या अपघातात काही जीवितहानी झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच विमानाला लागलेली आग वझविण्याचा पूर्ण सर्थीने प्रयत्न केला जातोय.
