Air India Plane Crash : ते अजून गप्प का? विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मोठा सवाल, त्या मौनावर उपस्थित केली शंका

Praful Patel Big Question : 12 जून रोजी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. यामध्ये 241 प्रवाशांसह 270 लोक मरण पावले. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Air India Plane Crash : ते अजून गप्प का? विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मोठा सवाल, त्या मौनावर उपस्थित केली शंका
प्रफुल्ल पटेल यांचा तो मोठा सवाल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 18, 2025 | 12:05 PM

12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. हे विमान लंडनसाठी रवाना झाले होते. पण अवघ्या काही सेकंदात ते कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांसह 270 लोक मरण पावले. एकूणच या अपघाताविषयी तपास सुरू असला तरी काही जण अपघाताबाबत संशय व्यक्त करत आहे. तुर्कीकडे सुद्धा काही जण बोट दाखवत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा दावा काय?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या विमान दुर्घटनेविषयी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सिंगापूर एअरलाईन्स या अपघाताप्रकरणी गप्प का असा सवाल विचारला आहे. काय आहे पटेल यांचा दावा?

पटेल म्हणाले की, एअर इंडिया दुर्घटनेभोवतीचा शोक आणि गोंधळ अजूनही सुरू आहे, पण या सगळ्या गदारोळात एक महत्त्वाचा भाग विसरला जात आहे. किंवा मुद्दाम दुर्लक्षित करण्यात येत आहे. तो म्हणजे एअर इंडियाच्या एका मोठ्या पार्टनर, भागधारकाची भूमिका अजूनही समोर आलेली नाही. सिंगापूर एअरलाईन्सकडे एअर इंडियाच्या बहुतेक wide-body विमानांच्या देखभालीची जबाबदारी आहे. ते या दुर्घटनेविषयी चकार शब्दाने पण काहीच बोलले नाही.

हे कमालीचे मौन कशासाठी?

प्रफुल्ल पटेल यांनी सिंगापूर एअरलाईन्स या अपघातावर मूग गिळून गप्प का? असा सवाल केला आहे. त्यांचं या सगळ्यावर कमालीचं मौन आहे. सिंगापूर एअरलाइन्स केवळ भागधारक नाही, तर व्यवस्थापनात त्यांचा प्रभाव आहे. त्यांचा codeshare agreement सुद्धा एअर इंडियासोबत असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. मग ते समोर का येत नाही. ते या विषयावर काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन हे सिंगापूर एअरलाइन्सचेच प्रतिनिधी आहेत. ते याआधी Scoot Airlines चे CEO होते. पण प्रश्न हा उरतो की, सिंगापूर एअरलाईन्स मौन का बाळगून आहेत, असे पटेल म्हणाले.