Air India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 19 जणांचा मृत्यू

केरळमध्ये कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरुन घसरलं.

Air India Plane Skids | केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन घसरलं, विमानाचे दोन तुकडे, 19 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 8:34 AM

केरळ : केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली (Air India Plane Skids). येथे एअर इंडियाचं विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरलं. धावपट्टीवर विमान घसरल्याने विमान क्रॅश झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर 123 जण जखमी आणि 15 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुंबईतील पायलट दीपक साठेंचाही मृत्यू झाला आहे (Air India Plane Skids).

क्रॅश होताच विमानाचे दोन तुकडे

ही दुर्घटना इतकी भीषण होती की विमान क्रॅश होताच विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून आलं होतं. या विमानात 189 प्रवासी प्रवास करत होते (Air India Plane Skids). दरम्यान, तात्काळ घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आणि बचावकार्याला सुरुवात झाली. तसेच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

रनवेवर लँडिंग करताना विमान घसरलं

एअर इंडिया एक्सप्रेसच्या AXB1344, बोईंग 737  विमानाने दुबईहून आज (7 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. मात्र, संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांवर रनवेवर लँडिंग दरम्यान हे विमान घसरलं.

डीजीसीएनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचं AXB1344, बोईंग 737 हे विमान दुबईहून कालीकट येथे येत होतं. या विमानात 190 पेक्षा जास्त लोक होते. मुसळधार पावसामुळे रनवेवर उतरल्यानंतर विमान घरसलं आणि खाडीत पडलं. विमानात 189 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांमध्ये 10 लहान मुलांचाही समावेश आहे. (Air India Plane Skids).

या भीषण दुर्घटनेत विमानाच्या पुढच्या भागाला जास्त नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कोझिकोड एअरपोर्टवर संध्याकाळी पाऊणे आठ वाजताच्या सुमारास घडली.

राष्ट्रपतींचं ट्विट –

“केरळच्या कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसच्या वेदनादायक विमान अपघाताविषयी ऐकून वाईट वाटलं. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. अपघातग्रस्त प्रवासी, क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत माझी सहानुभुती आहे”, असं ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी

काही मीडिया रिपोर्टनुसार, मुसळधार पावसामुळे रनवे जलमय झाला आहे. त्यामुळेच रनवेवरुन विमान घसरलं आणि 30 फूट खोल खाडीत जाऊन पडलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. माहितीनुसार, बचावकार्यासाठी मल्लापुरम येथून एनडीआरएफची टीम कोझिकोडसाठी रवाना झाली. एनडीआरएफच्या 50 जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

या विमान दुर्घटनेत अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींचा केरळच्या मुख्यमंत्र्यांना फोन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन परिस्थितीची माहिती घेतली. कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्हा आयुक्त आणि आयजी अशोक यादवसह अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच, पंतप्रधानांनी ट्विट करत या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाहांचं ट्विट –

“आमचे कर्मचारी बचाव कार्यात मदत करीत आहेत. आम्हाला अद्याप कुठल्याही जीवितहानीबाबत माहिती मिळालेली नाही. परंतु आमचे कर्मचारी विमानात बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत करत आहेत”, अशी माहिती सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन यांनी दिली. या दुर्घटनेनंतर हेल्पलाइन नंबर (0565463903, 0543090572, 0543090572, 0543090575) जारी करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

चेन्नईतही बेरुतसारख्या स्फोटाचा धोका, तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा

विषारी दारुचा कहर, तब्बल 21 जणांचा मृत्यू, पंजाबमधील थरारक घटना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.