चेन्नईतही बेरुतसारख्या स्फोटाचा धोका, तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा

बेरुतमधील महायभंयकर स्फोटानंतर भारतातही अमोनियम मायट्रेटच्या साठ्यावरुन चिंता व्यक्त केली जात आहे (After beirut blast alert out for ammonium nitrate lying at a chennai).

चेन्नईतही बेरुतसारख्या स्फोटाचा धोका, तब्बल 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा

चेन्नई : लेबनानची राजधानी असलेल्या बेरुत शहरात मंगळवारी (4 ऑगस्ट) दोन महाभयंकर स्फोट झाले. या स्फोटात 135 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला, तर 5000 नागरिक जखमी झाले. हा स्फोट अमोनियम नायट्रेट या रासायनिक स्फोटकामुळे झाल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर भारतातही अमोनियम मायट्रेटच्या साठ्यावरुन चिंता व्यक्त केली जात आहे (After beirut blast alert out for ammonium nitrate lying at a chennai).

चेन्नई शहराबाहेर 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा आहे. त्यामुळे सरकारने लेबनानच्या स्फोटातून धडा घेऊन या स्फोटकाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. कारण एक छोटी ठिणगीदेखील अख्ख शहर नेस्तनाबूत करु शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे (After beirut blast alert out for ammonium nitrate lying at a chennai).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

चेन्नईबाहेर 2015 साली 740 टन अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. या रासायनिक स्फोटकाची किंमत जवळपास 1.80 कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोनियम नायट्रेटचा विल्हेवाट लावण्यासाठी त्याची ई-निलामी केली जाणार आहे. तर चेन्नई बंदरावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी अमोनियम नायट्रेट बंदरापासून दुसरीकडे स्थालांतरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

चेन्नई कस्टमकडून 2015 साली 690 मॅट्रिक टन अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. अमोनियम नायट्रेटचा हा सर्व साठा 37 कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या साठ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी तत्काळ उपाययोजान केल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तमिळनाडूचा राजकीय पक्ष पीएमकेचे प्रमुख एस रामदॉस यांनी याबाबच ट्विट केलं आहे. चेन्नई बंदरावर 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा आहे. लेबनानच्या स्फोटातून धडा घेऊन लवकरात लवकर चेन्नई बंदरावरील स्फोटकाची विल्हेवाट करण्यात यावी, असं एस रामदॉस म्हणाले.

जगभरात अमोनियम नायट्रेटचे 7 मोठे स्फोट

1. चीन

लेबनानआधी 2015 साली चीनच्या तियानजिन शहरात अमोनियम नायट्रेचचे एका मागे एक असे अनेक स्फोट झाले होते. या स्फोटात फक्त अर्ध्या सेकंदात 300 पेक्षा जास्त इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. या स्फोटात 173 लोकांचा मृत्यू झाला होता.

2. उत्तर कोरिया

उत्तर कोरियाच्या रयोंगचोंग शहरात 2004 साली अमोनियम नायट्रेटमुळे मोठा स्फोट झाला होता. 22 एप्रिल 2004 रोजी दोन ट्रेनची टक्कर झाली होती. या ट्रेनपैकी एका ट्रेनमधून अमोनियम नायट्रेट लिक झाल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटात 160 लोकांचा मृत्यू तर 6 हजार पेक्षा जास्त जखमी झाले होते. या स्फोटात 1850 घरं उद्ध्वस्त झाली होती.

3. अमेरिकेत दोन शहरांमध्ये मोठे स्फोट

उत्तर कोरियाआधी अमेरिकेच्या अल्काहोमा शहरात 1995 साली मोठा स्फोट झाला होता. यात 168 जणांचा मत्यू झाला होता. त्याआधी 1947 साली अमेरिकेच्या टेक्सास शहरात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 581 लोकांचा मृत्यू झाला होता.

4. जर्मनीत जगातला सर्वात पहिला स्फोट

या जगातला अमोनिय नायट्रेटमुळे सर्वात पहिला स्फोट हा जर्मनीच्या ओपौ शहरात झाला होता. हा स्फोट 1921 साली झाला होता. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, 275 किमी दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला होता. या स्फोटात 561 लोकांचा मृत्यू झाला होता.

5. बेल्जियममध्ये जगातील दुसरा स्फोट

या जगातली सर्वात दुसरा मोठा स्फोट हा बेल्जियमच्या टेसेंडेर्लो शहरात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 190 जणांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट 1942 साली झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *