AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान टेकऑफ घेतानाच अचानक धावपट्टीवर आले माकड, पायलटने ब्रेक दाबले..अन्यथा

IndiGo Flight Delay: लखनऊ एअरपोर्टवर अचानक एका माकडाने एण्ट्री घेतल्याने इंडिगोच्या रायपूर जाणाऱ्या एका फ्लाईटला टेकऑफ घेण्यापूर्वीच ब्रेक लावावे लागले. या वेळी पायलटने प्रसंगावधान दाखवल्याने 170 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले.

विमान टेकऑफ घेतानाच अचानक धावपट्टीवर आले माकड, पायलटने ब्रेक दाबले..अन्यथा
indigo file photos
| Updated on: May 01, 2026 | 4:35 PM
Share

IndiGo Flight Delay: लखनऊ येथील चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी अनोखी घटना घडली आहे. येथील रनवेवर अचानक एका माकडाने एण्ट्री घेतल्याने पालयटने प्रसंगावधान राखत विमानाचे ब्रेक लागलीच दाबल्याने मोठा अपघात टळला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा इंडीगोची लखनऊ (Lucknow Airport News) ते रायपूर जाणारे फ्लाईट टेकऑफ घेण्याची तयारी करत होती. या इंडिगो फ्लाईट क्रमांक – 6E6521 मध्ये 170 प्रवासी आणि चालक दल प्रवास करत होते. विमानाने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात टळल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र, यामुळे विमानाला खूप उशीर झाल्याची घटना घडली आहे.

पायलटने दाखवले प्रसंगावधान

या लखनऊ ते रायपूरला जाणाऱ्या विमानाला धावपट्टीवरुन एअर ट्रॅफीक कंट्रोलने उड्डाणाची अनुमती मिळाली होती आणि विमान रनवे वरुन वेग पकडत होते. मात्र उड्डाण घेत असतानाच काही सेकंदाने पायलटची नजर रनवेवरील एका माकडाकडे गेली. संभाव्य धोक्याला ओळखून पायलटने लागलीच सतर्कता दाखल विमानाचे ब्रेक दाबले. त्यामुळे विमान आणि माकडाची टक्कर टळली आणि मोठा अपघात टळला.

काही वेळासाठी उड्डाणांना व्यत्यय –

या घटनेनंतर विमानाला सुरक्षितपणे रनवे वरुन हटवून पुन्हा एप्रनवर आणण्यात आले. संपूर्ण तपासणी केल्यानंतर विमानात कोणताही बिघाड नसल्याची खातरजमा करण्यात आली. त्यामुळे सकाळी ८.५५ वाजता उड्डाण घेणारे हे विमान सकाळी १०.०४ वाजता रायपूरसाठी रवाना झाले. या घटनेनंतर विमानतळावरील अन्य विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला. काही वेळासाठी विमानाची येजा बंद झाली एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका फ्लाईटला रनवेवर लँड होण्यापूर्वी दोन वेळा आकाशात घिरट्या मारायला लागल्या. कारण रनवे संपूर्णपणे साफ करायला वेळ लागला.

पहिल्यांदाच अशी घटना

अधिकाऱ्यांनी सांगितले की असे पहिल्यांदा झाले आहे की कोणते माकड रनवेवर आल्याने हवाई संचलन प्रभावित झाले आहे. म्हटले जात आहे की हे माकड कोणत्यातरी बागेतून विमानतळ परिसरात घुसले. नंतर सुरक्षा टीमने रनवे संपूर्णपणे सुरक्षित आणि रिकामा केला, तेव्हा कुठे विमानांच्या संचलनाला सर्वसामान्यपणे होऊ शकले. या घटनेने स्पष्ट झाले आहे की हवाई सुरक्षेत कोणतीही छोटीसी चूक देखील मोठा धोका सिद्ध होऊ शकते. यामुळे रनवे आणि विमान संपूर्णपणे तपासून उड्डाण घ्यावे लागले.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!