AIU ने अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व केले रद्द,वेबसाईट देखील झाली बंद, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
अल-फलाह यूनिव्हर्सिटी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर या विद्यापीठाचे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटा प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटीज (AIU) ने रद्द केले आहे.या विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर मुझम्मिल याला अटक झाली आहे. त्याच्या रुममधून स्फोटके आणि शस्रास्रे जप्त झाली आहेत. तर दिल्ली ब्लास्टमध्ये ज्या उमर उन नबीने आत्मघाती हल्ला केला तो देखील या युनिव्हर्सिटीशी जोडलेला आहे. त्यामुळे AIU ने तातडीच्या प्रभावाने अल-फलाह यूनिव्हर्सिटीची सदस्यत्व रद्द केले आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन यूनिव्हर्सिटीज (AIU) ने अल-फलाह यूनिवर्सिटीचे सदस्यत्व रद्द केले आहे. अलिकडे घडलेल्या घटनांमुळे विद्यापीठाचे नाव वादात सापडले आहे. या विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट देखील प्रशासनाने बंद केली आहे. संस्थेचे म्हणणे आहे की अलीकडील काही घटना विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला आणि आचारसंहितेला अनुसरून नाहीत त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल-फलाह यूनिव्हर्सिटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हरियाणाच्या फरीदाबाद येथील अतिरेकी मॉड्युलचा पोलिसांनी भंडाफोड केला होता.या कारवाईत पोलिसांनी अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर मुझम्मिल याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या रुममधून 360 किलो स्फोटके आणि शस्रास्रे जप्त झाली होती. एवढेच नव्हे तर दिल्ली ब्लास्टमध्ये ज्या उमर उन नबी याने आत्मघाती हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे, तो देखील याच अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. एकाच वेळी दोन उच्च शिक्षित डॉक्टर या विद्यापीठाशी संलग्न असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
AIU चे निवेदन काय ?
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) च्या उपनियमांनुसार, विद्यापीठाचे सदस्यत्व त्यांचे कार्य चांगले असेपर्यंत वैध राहते AIU ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.अलिकडील मीडियातील वृत्तांनुसार, हे स्पष्ट आहे की हरियाणातील फरीदाबाद येथे असलेले अल-फलाह विद्यापीठाची प्रतिष्ठा चांगली राहिलेली नाही. म्हणून, AIU ने तात्काळ प्रभावाने अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनने वेबसाईट बंद केली
सदस्यत्व रद्द झाल्यानंतर यूनिव्हर्सिटी प्रशासनने अल-फलाह यूनिव्हर्सिटीची अधिकृत वेबसाईट बंद केली आहे.आता वेबसाईटवर गेले असता तेथे युजरना ‘Service Unavailable’ चा संदेश दिसत आहे.
एआययू कोण आहे?
असोसिएशन ऑफ इंडियन यूनिव्हर्सिटीज (एआययू) देशभरातील विद्यापीठाची शीर्ष संस्था आहे. उच्च शिक्षण संस्थांना मान्यता आणि सहकार्य संबंधित महत्वाचे निर्णय घेत असते. कोणत्याही विद्यापीठाचे एआययू सदस्यत्व हे त्याच्या शैक्षणिक पातळीचे आणि विश्वासार्हतेचे प्रतीक मानले जाते.
