Nupur Sharma : ‘नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करणाऱ्याला माझं घर देईन’ अजमेर दर्गाच्या खादिमचं वादग्रस्त विधान

सलमान चिश्ती हा एक हिस्ट्री शीटर आहे. त्याच्यावर अजमेरच्या दरगाह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Nupur Sharma : 'नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करणाऱ्याला माझं घर देईन' अजमेर दर्गाच्या खादिमचं वादग्रस्त विधान
सलमान चिश्ती आणि नुपूर शर्मा
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jul 05, 2022 | 12:43 PM

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माने (Nupur Sharma) केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे (Umesh Kolhe Amravati Murder) यांच्या हत्येनं वातावरण अधिकच तापलंय. या सगळ्यात घडामोडींमध्ये आता अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम सलमान चिश्ती यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. एका व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या यांच्यावर बोलताना प्रक्षोभक विधानं केली आहे. त्याचा हा वादग्रस्त व्हिडीओही व्हायरल झाला आहे. नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करेल, त्याला मी माझं घर देईन, असं विधान त्यांनी केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या हत्येआधी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओप्रमाणेच हाही व्हिडीओ असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, आता खादिम सलमान चिश्ती विरोधात पोलिसांत (Police News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पोलीसही सतर्क झालेत.

काय म्हणाला खादिम सलमान चिश्ती?

व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान चिश्ती हा मद्यधुंद अवस्थेत दिसला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस सलमानचा शोध घेत आहेत. सलमानने या व्हिडीओमध्ये म्हटलंय की,…

आता पहिल्यासारखं नाही राहिलं, नाहीतर असं बोलला नसता. आईशप्पथ मी सरळ गोळ्याच घातल्या असत्या. मला माझ्या मुलांची शप्पथ, मी गोळ्या घातल्या असल्या आणि आजही छाती ठोकून सांगतोय, जो पण नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करुन घेऊन येईल, त्याला माझं घर देईन आणि मी रस्त्यावर येईल, हे सलमानचं वचन आहे!

कोण आहे सलमान चिश्ती?

सलमान चिश्ती हा एक हिस्ट्री शीटर आहे. त्याच्यावर अजमेरच्या दरगाह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्यानं केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथकंही तैनात केली आहेत.

वादग्रस्त विधान, हत्या आणि वाद

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थना पोस्ट करणाऱ्या दोघांची हत्या आतापर्यंत झाली आहे. उदयपूरच्या कन्हैया लालच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय. तर या हत्येचा व्हिडीओ समोर आलाय. या हत्येआधी सोशल मीडियात पोस्ट करत कन्हैया लाल याची हत्या करु, अशी चिथावणी देण्यात आली होती. त्यानंतर कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे महाराष्ट्राच्या अमरावतीमध्येही उमेश कोल्हे यांच्या हत्येचेही पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या दोन्ही धक्कादाय घटनांच्या पार्श्वभूमीवर आता खादिम सलमान चिश्तीने केलेलं वादग्रस्त विधान आगीत तेल ओतण्यासारखं असल्याची भीती व्यक्त केली जातेय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें