AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला युद्धात गुंतवून अमेरिकेचा गुपचूप मोठा खेळ, रशियानं खरा चेहरा उघड करताच, भल्या-भल्या देशांची उडाली झोप

मोठी बातमी समोर येत आहे, मध्य पूर्वेत युद्ध सुरू असातना रशियाकडून अमेरिकेसंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, जगाला मोठा धक्का बसला आहे.

जगाला युद्धात गुंतवून अमेरिकेचा गुपचूप मोठा खेळ, रशियानं खरा चेहरा उघड करताच, भल्या-भल्या देशांची उडाली झोप
putin, donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 5:12 PM
Share

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 23 दिवस उलटले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता रशियाकडून अमेरिकेवर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या दाव्यामुळे जगाची झोप उडाली आहे. या युद्धात सुरुवातीपासूनच चीन आणि रशिया इराणच्या बाजूने आहेत. इराणने आयतुल्ला अली खामनेई यांच्या मृत्यूनंतर आपल्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करताच रशियाने इराणला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच अमेरिका आणि इस्त्रायलकडून शनिवारी इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला, यानंतर देखील रशियानं आक्रमक भूमिक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान आता रशियाकडून अमेरिकेसंदर्भात खळबळजनक दावा करण्यात आला आहे, या दाव्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गोई लावरोव यांनी अमेरिकेसंदर्भात मोठा दावा केला आहे. रशियाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की, अमेरिकेला जागतिक ऊर्जा मार्केटवर आपला दबदबा निर्माण करायचा आहे, आणि त्या दृष्टीने त्यांनी आपली रणनिती आखली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, अमेरिकेला केवळ आपल्या हिताची चिंता आहे. ते आपल्या फायद्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतात. त्यासाठी जर त्यांना एखाद्या देशाची सत्ता उलथून लावायची असेल तर त्याला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. हा सर्व मुद्दा कच्च्या तेलाशी संबंधित असून, अमेरिकेला जगभरातील ऊर्जा संसाधनावर सत्ता गाजवायची आहे, आणि त्याचदृष्टीने अमेरिका गेल्या काही दिवसांपासून पावलं उचलत असल्याचा दावा रशियानं केलं आहे.

पुढे बोलताना रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं देखील म्हटलं की, अमेरिकेचा एकच सिद्धांत आहे, ते कोणताही आंतरराष्ट्रीय करार करताना आधी आपला फायदा पहातात. जर त्यांना रशियासोबत भविष्यात बोलणी सुरू ठेवायची असेल तर त्यांना आधी रशियाची बाजू ऐकून घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

मध्य पूर्वेत मोठा तणाव 

दरम्यान इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे. यावरून काही देशांनी आता इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?