AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने TV9 भारतवर्षची मागितली माफी; Operation Sindoor प्रकरणात मान्य केली ती चूक

Operation Sindoor : अखेर टीव्ही 9 समोर अमेरिकेतील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने माफी मागितली. इतकेच नाही तर वॉशिंग्टन पोस्टने हे पण स्वीकार केले की, त्यांच्या लेखात TV9Bharatvarsh विषयी जो दावा करण्यात आला होता, तो चुकीचा होता. भारतीय माध्यम क्षेत्रासाठी हा सुवर्णदिवस म्हणावा लागेल.

अमेरिकेच्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने TV9 भारतवर्षची मागितली माफी; Operation Sindoor प्रकरणात मान्य केली ती चूक
अमेरिकेच्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने TV9 भारतवर्षची मागितली माफी
| Updated on: Jul 29, 2025 | 1:19 PM
Share

washington post apologizes to TV9 Bharatvarsh : टीव्ही 9 भारतवर्षची अखेर जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने माफी मागितली. या वृत्तपत्राने हे मान्य केले की, त्यांनी TV9Bharatvarsh विषयी जो दावा केला होता, तो चुकीचा होता. भारतीय माध्यम क्षेत्रासाठी हा सुवर्णदिवस म्हणावा लागेल. जगातील एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने भारतातील सर्वात अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिनीची माफी मागितली. टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या जबाबदारी पूर्ण वार्तांकनाचा हा विजय आहे. टीव्ही 9 न्यूज नेटवर्क वार्तांकन करताना बारकाईने आणि तथ्यांवर आधारीत सत्य समोर आणते, त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

अखेर माफी मागावीच लागली

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान संघर्ष उडाला होता. त्यावेळी 7 जून 2025 रोजी द वॉशिंग्टन पोस्टने भारतीय वृत्त वाहिन्यांच्या वार्तांकनावर आक्षेप घेतला. त्याविषयीचा एक लेख त्यांनी छापला. तो जगभरातील वाचकांनी वाचला. त्यात TV9 भारतवर्षचे नाव घेत हा दावा करण्यात आला की, वृत्तवाहिनी ही तथ्यांआधारे चुकीचे वार्तांकन करत आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या या तर्कहीन, तथ्यहीन, असत्य दाव्याला मग TV9 ने पुराव्यासहित उत्तर दिले. वॉशिंग्टन पोस्टला टीव्ही 9 ने कायदेशीर नोटीस पाठवली. टीव्ही 9 ने वॉशिंग्टन पोस्टला हिसका दाखवला.

मग अमेरिकन वृत्तपत्र ताळ्यावर

washington post ने मग लागलीच नांगी टाकली. या वृत्तपत्राने चूक मान्य केली आणि माफी मागितली. त्यांनी अधिकृतपणे टीव्ही 9 न्यूज नेटवर्कला एक ई-मेल पाठवला. त्यात “We regret the error” आणि TV9 भारतवर्षचे नाव या लेखातून हटवल्याचे सांगितले. हा टीव्ही 9 च्या जबाबदारीपूर्ण वार्तांकनाचा नैतिक विजय आहे.

आम्हाला पुरावे, तथ्ये, सत्याची चाड

TV9Bharatvarsh मध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की, आम्हाला तुमची काळजी आहे, आम्हाला देशाची काळजी आहे. तेव्हा आपल्याला पुरावे, तथ्ये, सत्य यांची काळजी असते. आणि आपल्याला देशाची, त्याच्या प्रतिमेची, त्याच्या विचारसरणीची आणि त्याच्या धारणाची काळजी असते. बातमीची वस्तुस्थिती, सत्यतेमुळेच आम्ही आमचे काम लोकांसमोर आणि जागतिक स्तरावर दृढतेने, दृढतेने आणि प्रामाणिकपणे करतो. सत्य उघडपणे मांडणे ही आमची प्रतिज्ञा आणि वचनबद्धता आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.