AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यामागे अमेरिकेचे कनेक्शन?, दोन महिने आधीच या भूमीवर रचला कट ?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या अतिरेक्यांचा हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यामागे अमेरिकेचे एक हादरवणारे कनेक्शन उघड झाले आहे.

पहलगाम हल्ल्यामागे अमेरिकेचे कनेक्शन?, दोन महिने आधीच या भूमीवर रचला कट ?
| Updated on: May 11, 2025 | 5:58 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या अतिरेक्यांचा हल्ल्यात अमेरिकेचे हादरवणारे कनेक्शन उघड झाले आहे. या मागे पाकिस्तानचे मोठे षडयंत्र यामागे उघड झाले आहे. अमेरिकेशी तडजोड करण्याचा पाकिस्तानचा हेतू विफल झाला आहे. अमेरिकन स्पेस कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीज ( Maxar Technologies ) च्या डाटाने एक नवा खुलासा झाला आहे. काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधीच अमेरिकन तंत्राचा वापर करुन हा हल्ला झाल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

Maxar Technologies

संशयास्पद सारेच…

हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वीच पहलगाम आणि आसपासच्या लष्करी ठाण्यांचे हाय-रिझोल्यूशन सॅटेलाईट्सची इमेजची ऑर्डर अचानक दुप्पट झाली होती.२ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २० दिवसात १२ ऑर्डर पहलगाम क्षेत्रातून आल्या होत्या असे होते अमेरिकन स्पेस टेक कंपनी मॅक्सर टेक्नोलॉजीज (Maxar Technologies) याच्या डाटातून उघडकीस आले होते.

2 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान केवल 20 दिवसात 12 ऑर्डर पहलगाम क्षेत्रासाठी आल्या होत्या.ही संख्या सर्वसामान्य ऑर्डरच्या तुलनेत दुप्पट आहे. एवढेच नाही तर या इमेज ऑर्डरची सुरुवात जून २०२४ मध्येच झाली होती. त्याच वेळी जेव्हा मॅक्सरने पाकिस्तानची एक कुख्यात जिओ-स्पेशियल कंपनी “Business Systems International Pvt Ltd (BSI)” सोबत करार केला होता.

कोण आहे BSI? का आहे भारतासाठी धोका?

BSI चे मालक ओबैदुल्ला सैयद याला अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवून जेलमध्ये पाठवले होते. त्याच्यावर अवैधरित्या हाय रिझोल्युशनचे कंप्युटर आणि सॉफ्टवेअर अमेरिकेतून पाकिस्तानच्या Atomic Energy Commission (PAEC) ला पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. Atomic Energy Commission कंपनी आण्विक अस्रे, क्षेपणास्रांचा विकास करते. हा निव्वळ योगायोग आहे की तिच कंपनी एका अमेरिकन सॅटेलाईट सेवा पुरवठादाराशी संधान साधून भारताच्या सैन्य ठाण्यांची फोटो हस्तगत करत आहे ?

कोणत्या क्षेत्रांचे सॅटेलाईट फोटो घेतले?

पहलगाम

पुलवामा

अनंतनाग

राजौरी

पुंछ

बारामूला

अत्यंत संवेदनशील माहीती पुरविली

वरील सर्व क्षेत्र भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत. या सॅटेलाईट इमेजी किंमत तीन लाखांपासून सुरु होत आहे. आणि दर्जानुसार त्याची किंमत कित्येकपटींनी वाढते. इस्रोच्या एका वरिष्ठ संशोधकाने सांगितले की हे स्पष्ट आहे की या सॅटेलाईट इमेजिंगचा वापर अतिरेक्यांनी प्लानिंगसाठी केलेला असू शकतो. भारत सरकारने मॅक्सर कंपनीची तातडीने चौकशी करायला हवी ? लेफ्टनंट जनरल ए.के.भट्ट ( सेवानिवृत्त ) ( आता इंडियन स्पेस एसोसिएशनचे ( ISpA ) डायरेक्टर जनरल आहेत ) त्यांनी म्हटलेय की हा तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा सर्वात मोठा धोका आहे.

पाकिस्तानचा कट काय होता?

हाय-रिझोल्यूशन सॅटेलाइट इमेजद्वारे भारतीय सैन्याची तैनात, सुरक्षित ठिकाण आणि मूव्हमेंट यावर पाळत ठेवणे

अतिरेकी संघटनांना अचूक टार्गेटींगसाठी मदत करणे

अतिरेक्यांना रूट मॅपिंग आणि लपण्यासाठी सुरक्षित मार्ग सुचवणे

भारताच्या अंतर्गत सुरक्षा नेटवर्कला कमजोर करण्याची रणनीती आखणे

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.