AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात ओबीसींवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसकडूनच; अमित शाह यांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या कार्यक्रमात काँग्रेसवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसने ओबीसींवर सर्वात जास्त अन्याय केल्याचं शाह म्हणाले.

या देशात ओबीसींवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसकडूनच; अमित शाह यांचा हल्लाबोल
| Updated on: Feb 27, 2024 | 11:17 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते  राहुल गांधी यांना माहीत नाही या देशातील ओबीसींवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसनेच केला. काका कालेलकर आयोग तसाच पडला. मंडल कमिशनही लागू केला नाही. तो व्हीपी सिंगने लागू केला. ओबीसी कमिशन कधी काँग्रेसने बनवलं नाही. नीटमध्ये कधी काँग्रेसने ओबीसींना आरक्षण दिलं नाही. हे सर्व मोदींनी केल्याचं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले अमित शहा?

तुमच्यासाठी समान नागरी कायदा हा राजकीय मुद्दा असेल. पण हा सामाजिक सुधार आहे. धर्माच्या आधारे कायदा नसावा. लोकांच्या हितासाठी हे कायदे असावे. संविधान सभेनेही योग्यवेळी समान नागरी कायदा आणावी असं सूचवलं आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून आम्ही त्यावर बोलत होतो. आमची नवी गोष्ट नाही. पक्ष तयार झाल्यापासूनची ही गोष्ट आहे. संविधान सभेत नेहरूपासून केएम मुन्शीपर्यंत सर्व लोक होते. त्यांनीच हे मांडलं आहे. काँग्रेसला काय झालं ते कळत नाही. कमीत कमी पणजोबाची म्हणणं तरी समजलं पाहिजे,  असं अमित शहा म्हणाले.

समान नागरी कायद्याचा विचार- शाह

निवडणुकीनंतर सर्व राज्य विचार करेल आणि संपूर्ण देशात लागू केला जाईल. महत्त्वाची सुधारणा आहे. सोशल रिफॉर्म आहे. त्यावर खुली चर्चा झाली पाहिजे. यूसीसी काय आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. त्याचा इतिहास सांगितला पाहिजे, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

हिंदू कोडबिल नाही. हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न नाही. संभ्रमित करण्याचा प्रयत्न आहे. हिंदू धर्मातील लोाकंनीही अनेक गोष्टी स्वीकारल्या . हुंडा कायदा, सती प्रथा, हिंदुतील बहुपत्नीत्व होतं तेही रद्द झालं. कुणी विरोध केला नाही. पण चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याची टीका शाहांनी मुलाखतीमध्ये बोलताना केली.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.