AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्ह्यांच्या तपासाला आता नवा आयाम, ‘भारतपोल’ पोर्टलचे उद्घाटन करताना अमित शाह यांची घोषणा

भारतपोल पोर्टल भारतीय LEA ला आंतरराष्ट्रीय पोलीस मदत वेगाने मिळावी यासाठी रिअल-टाइम माहितीचे सामायीकरण सक्षम करण्यासाठी चांगली सुविधा प्रदान करणार आहे. त्यामुळे इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसंदर्भात पोलीस यंत्रणेला वेगाने माहीती मिळून कारवाई करणे सोपे होणार आहे.

गुन्ह्यांच्या तपासाला आता नवा आयाम, 'भारतपोल' पोर्टलचे उद्घाटन करताना अमित शाह यांची घोषणा
Amit Shah unveils 'Bharatpol'
| Updated on: Jan 07, 2025 | 4:32 PM
Share

देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा इंटरपोलशी संबंधित प्रकरणांना जबाबदार राहणार आहे.

सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन कट्टरता, संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी यांच्यासह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची वाढती संख्येमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने आणि वास्तविक वेळेत होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठी या प्रकारच्या पोर्टलची आवश्यकता होती. या वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीबीआयने हे भारतपोर्टल विकसित केले आङे. याच्या अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली असून ती अतिशय सुलभ आहे. ही वेबसाईट सर्व तपास यंत्रणांना एकत्र व्यासपीठ मिळवून देणार आहे.

 देशाला इन्व्हेस्टीगेशनच्या नव्या युगात

भारतात इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या ( एनसीबी-नवी दिल्ली ) रुपात सीबीआय,इतर कायदे अंमलबजावणी एजन्सींसह देशभरातील विभिन्न एजन्सींचा एकत्र मिळून गुन्ह्यांच्या प्रकरणांत आंतरराष्ट्रीय मदतीची सुविधा प्रदान करणार आहे. भारतपोल लाँच झाल्यानंतर देशातील सर्व पोलिस यंत्रणा आणि तपास एजन्सींना त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. भारतपोल हे पोर्टल देशाला इन्व्हेस्टीगेशनच्या नव्या युगात घेऊन जाईल असे भारतपोल पोर्टल लाँच करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

भारतपोलच्या मागे हे 5 मॉड्यूल –

एकमेकांना जोडणे –

देशातील इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या रुपात सीबीआयला इंटरपोल संपर्क अधिकारी तसेच युनिट अधिकाऱ्यांना सामील करुन देशातील सर्व तपास यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणणार

इंटरपोल नोटीस –

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या प्रकरणात इंटरपोलला वेगाने नोटीस पाठवता येणार आहे. तसे हे पोर्टल सुरक्षित आणि संरचित असेल. हे जगभरातील सर्व गुन्हे तपास एजन्सींना एक जागतिक माहिती देवाण घेवाणाचे व्यासपीठ असणार आहे.

इंटरपोल संदर्भ –

इंटरपोल चॅनलद्वारे १९५ देशांशी गुन्ह्यांच्या प्रकरण आणि परदेशातील तपासासाठी भारतीय गुन्हे तपास यंत्रणांना त्वारित आंतरराष्ट्रीय मदतीची सुविधा प्रदान होणार आहे.

माहितीचे प्रसारण –

195 देशांकडून मदतीसाठी विनंती किंवा त्यांच्याद्वारे केलेली गुन्हेगारी गुप्तचर कारवाई किंवा माहिती भारतीय कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना मिळणार आहे.

संसाधन –

गुन्ह्यांसंबंधित कागदपत्रांची देवाण-घेवाण आणि तपास यंत्रणांच्या क्षमतेत वाढ करणे, तपास यंत्रणांच्या यशाच्या कहाण्या आणि नवे घटनाक्रमांना प्रदर्शित करण्यासाठी ‘भारतपोल’ एक महत्वाची विंडोच्या म्हणून काम करेल.

Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक