गावच्या पडक्या घरात सापडली 200 वर्ष जुनी तिजोरी, अशी गोष्ट सापडली, ती पाहून अख्ख्या गावाची झोप उडाली
गावात घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खोदताना ही तिजोरी सापडली,त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरुन गावात आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले.

आपल्या देशातील गावात जुन्याकाळातील लोक आपल्या मुल्यवान वस्तू लपवून ठेवत असत. त्याकाळी बँका नव्हत्या. त्यामुळे पैसा अडका आणि किंमती दागिने लोखंडाच्या तिजोरीत लपवून ठेवले जात. काही लोक आपल्या मुल्यवान वस्तू भितींमध्ये किंवा जमिनीत गाडून टाकायचे. असाच प्रकार एका गावात उघडकीस आला आहे ही तिजोरी उघडल्यानंतर सर्वजण एकमेकांकडे पाहातच राहीले.
युपीतील एटा जिल्ह्यातील जिन्हेरा गावात नवीन घर बांधण्यासाठी खोदकाम करताना जुन्या काळातील तिजोरी सापडली आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली. या तिजोरीला खजाना सापडल्याची बातमी आजूबाजूच्या गावात पसरुन लोकही जमा झाले. या तिजोरीत गुप्त खजाना सापडला असावा असेच सगळ्यांना वाटले. जशा कहाण्या आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ही बाब जंगलातील वणव्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
मिरहची येथील जिन्हेंरा गावात तिजोरी सापडल्याची माहिती जेव्हा पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला सांगितली तेव्हा उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदाराची टीम स्थापन करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्या समोर तिजोरीला उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी १६ जून रोजी अधिकारी गावी पोहचले.त्यांनी व्हिडीओग्राफी करुन ही तिजोरी उघडली. टाळा तोडल्यानंतर या तिजोरीतून एक जोडी सोन्याचे टॉप्स, एक चांदीचे मंगळसूत्र आणि काही कागदपत्रे सापडली. तिजोरीत सापडलेल्या वस्तूंची यादी करुन घर मालकाकडे त्या वस्तू सोपवण्यात आल्या.
जुन्या काळातील जमीनदार
वास्तविक खोदकामात सापडलेली तिजोरी ज्या कुटुंबाची होती त्यांचे पूर्वज जुन्याकाळातील जमीनदार होते. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी मिरहची येथील १०० बिघा जमीन शाळेला दान केली होती. परंतू आता त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यांचे पूर्वजांचे घरही कोसळले आहे. त्यांना पीएम आवास योजनेत आता घर मंजूर झाले आहे. त्याच घराची बांधकाम करताना ही तिजोरी सापडली.
