AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुड न्यूज! अंदमानमध्ये लपलाय खजिना, भारताचे नशीब बदलणार; तेलाची आयात कमी होणार

Gas Discovery in India : भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% तेल आणि जवळपास 70% गॅस आयात करतो. मात्र आता आगामी काळात देशाची चिंता मिटण्याची शक्यता आहे. कारण भारतात मोठे साठे मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

गुड न्यूज! अंदमानमध्ये लपलाय खजिना, भारताचे नशीब बदलणार; तेलाची आयात कमी होणार
Gas DiscoveryImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 01, 2026 | 6:59 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या युद्धामुळे आखाती देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचा इंधन पुरठा खंडित झाला आहे. यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% तेल आणि जवळपास 70% गॅस आयात करतो. मात्र आता आगामी काळात देशाची चिंता मिटण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून आशेची किरण समोर आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ खोल समुद्रात भारताला मोठा खजिना सापडण्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे आगामी काळात जो येत्या काही दशकांत देशाचे चित्र बदलू शकतो.

मोठा खजिना मिळण्याची शक्यता

अंदमान-निकोबार हा भाग नो-गो क्षेत्र मानले जात होते, म्हणजेच या भागात जाण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र आता सरकारच्या खुले क्षेत्र परवाना धोरण (Open Acreage Licensing Policy) मुळे सुमारे 10 लाख चौरस किमी क्षेत्र शोधासाठी खुले झाले आहे. अंदमान बेसिन हे भारतातील सर्वाधिक खनिजसाठा असलेले संभाव्य पण कमी शोधले गेलेले ऑफशोर क्षेत्र मानले जाते. शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते येथे सुमारे 371 मिलियन टन ऑइल इक्विव्हॅलेंट (mmtoe) संसाधने असू शकतात. हा आकडा खूप मोठा आहे.

OIL आणि ONGC ची मोठी ड्रिलिंग मोहीम

भारतातील दोन प्रमुख सरकारी कंपन्या OIL आणि ONGC यांनी 2026 च्या सुरुवातीपासून अंडमान-निकोबार बेसिनमध्ये ड्रिलिंग करत आहेत. हे क्षेत्र अद्याप फ्रंटियर आणि प्री-कमर्शियल टप्प्यात आहे, म्हणजेच हायड्रोकार्बनचे संकेत मिळाले असले तरी पूर्ण शोध आणि व्यावसायिक उत्पादन अजून बाकी आहे. OIL ने विजयपूरम-1, 2 आणि 3 अशा तीन विहिरी ड्रिल केल्या आहेत. विजयपूरम-2 मध्ये 87% मिथेन असलेला गॅस आढळला असून 2,212–2,250 मीटर खोलीवर प्रवाहाचे संकेत मिळाले आहेत, तर विजयपूरम-1 कोरडी होती.

ONGC ने AND-P1 नावाच्या अल्ट्रा-डीपवॉटर विहिरीवर काम सुरू केले असून समुद्रतळाखाली 6,000 मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्याचे लक्ष्य आहे. सध्या सुमारे 4,000 मीटरपर्यंत खोदकाम झाले आहे. सध्या ANDW-7 आणि ANDW-9 या विहिरींमध्ये गॅसचे संकेत मिळाले आहेत. मात्र हे संपूर्ण यश म्हणता येणार नाही. तज्ञांच्या मते, सध्या दोन्ही कंपन्यांचे लक्ष भूगर्भीय क्षमता समजून घेण्यासाठी शोध आणि परीक्षण ड्रिलिंगवर आहे.

10 वर्षे लागणार

अंदमान सारख्या भागात ड्रिलिंग कठीण आहे, कारण हे अल्ट्रा-डीपवॉटर क्षेत्र असल्याने समुद्राची खोली आणि तळातील दाब अत्यंत जास्त असतो. अशा भागात खनिजांच्या शोधापासून उत्पादनापर्यंतचा प्रवास 6 ते 10 वर्षे असू शकतो. केवळ विहिरी खोदणे पुरेसे नाहीये तर समुद्राखाली पाइपलाइनचे जाळे उभारणे, गॅस लिक्विफाय करण्यासाठी प्लांट उभारणे आणि तो सुरक्षितपणे मुख्य भूमीपर्यंत पोहोचवणे ही मोठी आव्हाने आहेत. फक्त गॅस मुख्य भूमीपर्यंत पोहोचवण्यासाठीच सुमारे 5 वर्षे लागू शकतात, त्यामुळे येथून उत्पादन सुरु होण्याठी कमीत कमी एका दशकाचा कालावधी लागू शकतो.

या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे आढळल्यास 2030 च्या दशकाच्या सुरुवातीपूर्वी किंवा मध्यापूर्वी व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अंदमान मधील हा शोध तात्काळ उपाय नसून दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. जर येथे उत्पादन यशस्वी झाले, तर 2030 च्या दशका मध्यानंतर भारताची आयात कमी होऊ शकते.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?