AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक, जगमोहन रेड्डी जखमी; कपाळाला टाकेच पडले

देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं रण पेटलं आहे. आंध्र प्रदेशात तर लोकसभेसोबत विधानसभेच्याही निवडणुका असल्याने प्रचाराचा नुसता धुरळा उठला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत प्रचंड जोर लावला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही रॅलीला सुरुवात केली आहे. मात्र, काल रॅली करत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. त्यात ते जखमी झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक, जगमोहन रेड्डी जखमी; कपाळाला टाकेच पडले
CM Jagan Mohan ReddyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2024 | 4:19 AM
Share

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा रोड शो सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिशेनेच दगड भिरकावण्यात आले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही या दगडाचा मारा बसला आहे. त्यांच्या कपाळावर दगड येऊन आदळल्याने कपाळाला खोच पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे आंध्रप्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

विजयवाडाच्या सिंह नगरमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा बसमधून रोड शो सुरू होता. त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला लागला आहे. अगदी डोळ्याच्यावर भुवयांजवळ दगड लागल्याने मोठी खोच पडली. मुख्यमंत्री जखमी होताच बसमध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी पुन्हा निवडणूक प्रचार सुरू केला.

दोन टाके पडले

वायएसआर काँग्रेस पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. त्यांनी राज्यात वुई आर रेडी हे कँम्पेन सुरू केलं आहे. बसमधून ही मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्ताने स्वत: जगन मोहन रेड्डीही या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते. उघडया बसमधून त्यांचं कॅम्पेन सुरू होतं. पण इतक्यात कोणी तरी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला भुवयांच्या जवळ लागला. त्यामुळे खोच पडली. यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यांच्या कपाळाला दोन टाके मारण्यात आले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून मुख्यमंत्र्यांचा डोळा थोडक्यात बचावला आहे.

शाळेजवळून दगड फेकला

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दगडफेक शाळेच्या जवळून झाली आहे. ही शाळा रॅली निघाली त्याच्या बाजूलाच होती. दरम्यान, वायएसआरसीपीच्या एका सदस्याने तर या मागे टीडीपी आघाडीचा हात असल्याचा आरोप केला आहे. टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू घाबरल्याचं या कृत्यातून दिसून येतं असं या सदस्याने म्हटलं आहे.

’13 मे रोजी मतदान

दरम्यान, आंध्रपदेशातील विधानसभेच्या 175 आणि लोकसभेच्या 25 जागांसाठी मतदान होत आहे. येत्या 13 मे रोजी या दोन्ही निवडणुकीसाठी आंध्रप्रदेशात मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीने 151 जागा आणि लोकसभेच्या 22 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी राज्यात टीडीपी, भाजप आणि जन सेनेची आघाडी झाली आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.