AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलम 370, राम मंदिर नंतर आता काय? भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

भाजपचा जाहीरनाम उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. भाजप आपल्या या जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कलम ३७०, राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर आता भाजपचा पुढचा संकल्प काय असणार याकडे लक्ष.

कलम 370, राम मंदिर नंतर आता काय? भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार
bjp manifesto
| Updated on: Apr 13, 2024 | 5:09 PM
Share

BJP Manifesto : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून “संकल्प पत्र” नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ९ वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.

जाहीरनाम्यात काय असेल विशेष

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जाहीरनाम्यात विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यांच्यावर भर असेल. पक्ष केवळ तीच आश्वासने देणार आहे जी येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचा भाजपचा संकल्प असेल. “मोदीची हमी: विकसित भारत 2047” असं या जाहीरनाम्याची थीम असू शकते.

15 लाखांहून अधिक सूचना प्राप्त

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. भाजपला त्यांच्या जाहीरनाम्यासाठी 15 लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत, ज्यात नमो ॲपद्वारे चार लाखांहून अधिक आणि व्हिडिओद्वारे 10 लाखांहून अधिक सूचनांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाने यासाठी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. ज्यामध्ये २७ सदस्यांचा समावेश होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निमंत्रक आणि सहसंयोजक होते. जाहीरनामा पॅनेलच्या सदस्यांमध्ये अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, स्मृती इराणी, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र पटेल यांचा समावेश होता.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

काँग्रेसने भाजपच्या आधी “न्याय पत्र” नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. राहुल गांधींनी जनतेसाठी 25 हमी दिल्या आहेत. कुटुंबातील सर्वात गरीब महिलांना वार्षिक 100,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्य वचन दिले आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.