पाकिस्तानचा जावई भलताच संतापला; म्हणाला सासुरवाडीला उडवून द्या, बायकोही…
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे. भारत सरकारनं या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या औराई गावात राहणारे आफताब आलम यांनी देखील पाकिस्तानविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे आफताब आलम हे पाकिस्तानचे जावई आहेत. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आफताब आलम यांनी म्हटलं आहे की, आता सर्जिकल स्ट्राइक नाही तर आरपारची लाढाई झाली पाहिजे.
सध्या माझी पत्नी आणि मुलगी पाकिस्तानमध्ये आहे, पण माझ्यासाठी माझा देश आधी आहे आणि त्यानंतर माझं कुटुंब असं आफताब आलम यांनी म्हटलं आहे. आफताब आलम यांनी पाकिस्तानची रहिवासी असलेल्या सायना कौसर नावाच्या महिलेसोबत लग्न केलं आहे. सायना कौसर या पाकिस्तानच्या कराचीमधील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, तर त्यांची मुलगी कराचीमध्येच एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अफताब यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही, पाकिस्तान तिथे राहणाऱ्या नागरिकांसोबत माणुसकीनं वागत नाही, मग शेजारी देशांबाबत आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यामुळे आता आर-पारच्या लढाईची वेळ आली आहे. जर वेळ पडली तर मी माझ्या बायकोची आणि मुलीची कुर्बानी देखील द्यायला तयार आहे. पण माझ्यासाठी माझा देश पहिला आहे.
आफताब पुढे बोलताना म्हणाले की, माझं लग्न 2012 साली पाकिस्तानात सायना कौसरशी झाला. मी पाकिस्तानमध्ये माझ्या आत्याला भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं आमचं लग्न झालं. मला एक 11 वर्षांची मुलगी आहे, ती कराचीमध्ये पाचवीत शिकते. मी अनेकदा माझ्या पत्नीला आणि मुलीला भारतात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मला लाँग टर्म व्हीसा मिळू शकला नाही. शॉर्ट टर्म व्हीसामुळे ते भारतात आले तरी देखील त्यांना पुन्हा पाकिस्तानला जावं लागत होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पाकिस्तानविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आरपारच्या लढाईची त्यांनी मागणी केली आहे.
