AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प. बंगालमध्ये भाजपाला आणखी एक धक्का, नाराज खासदार अर्जुन सिंह तृणमूलमध्ये परतले. 11 महिन्यांत 5 मोठ्या नेत्यांची भाजपाला सोडचिठ्ठी

२०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

प. बंगालमध्ये भाजपाला आणखी एक धक्का, नाराज खासदार अर्जुन सिंह तृणमूलमध्ये परतले. 11 महिन्यांत 5 मोठ्या नेत्यांची भाजपाला सोडचिठ्ठी
BJP MP in TrinmoolImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 8:18 PM
Share

कोलकाता . बंगाल (West Bangal)विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP)पराभव झाल्यानंतर, आता राज्यात ममता यांच्या तृणमूल काँग्रेसकडे राजकीय (Trinmool congress)नेते परतताना दिसत आहेत. . बंगालच्या बरैकपूरचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. अर्जुन सिंह हे प. बंगाल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. २०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपा नेतृत्वावर अर्जुन सिंह यांची टीका

एसी खोल्यांत बसून राजकारण केले जात नाही. त्यासाठी जनतेत जावे लागते आणि त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो. त्यासाठी भाजपाला प्रयत्न करण्याची गरज आहे. भाजपात इतरांना जबाबदार धरण्यात येते. भाजपात असलेल्या दोन तृणमूलच्या खासदारांनीही राजीनामे देऊन परतावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अर्जुन सिंह नाराज

पक्षात गेल्या सहा महिन्यांपासून महत्त्व कमी करण्यात आल्याने अर्जूनसिंह नाराज होते. तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पक्षश्रेष्ठी सक्रिय झाले, मात्र त्यांचे फोन अर्जुन सिंह घेत नव्हते, अशी माहिती आहे.

खासदारकीचा राजीनामा देणार नाही

पक्ष बदलला असला तरी लगेच खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपातील दोन तृणमूलमुलच्या खासदारांनी राजीनामा दिला की आपणही त्यांच्यासोबतच राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. तृणमूलचे शिशिर अधिकारी आणि सुनील मंडल या तृणमूलच्या दोन खासदारांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता, मात्र त्यांनीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. तूर्तास हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांकडे आहे.

गेल्या ११ महिन्यांत ५ मोठ्या नेत्यांचा भाजपाला रामराम

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सफलता मिळाली नाही, त्यानंतर जून २०२१ मध्ये मुकुल रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यावंतर राजीव बॅनर्जी, बाबुल सुप्रियो आणि विश्वजीत दास या बड्या नेत्यांनीही रामराम ठोकला. सध्या बॅनर्जी हे त्रिपुराचे प्रभारी आहेत तर बाबुल सुप्रियो आमदार झाले आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.