AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं आणखी एक मोठं कांड, मोबाईल पहाताच पोलीस हादरले, तब्बल 90 व्हिडीओ…

माजी खासदार प्रज्वल रेवन्ना सध्या तुरुंगात आहे. दरम्यान आता त्याचं आणखी एक धक्कादायक कांड समोर आलं आहे. तो तुरुंगात चोरून मोबाईल वापरायचा, हा मोबाईल जेव्हा पोलिसांनी तपासला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे.

बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं आणखी एक मोठं कांड, मोबाईल पहाताच पोलीस हादरले, तब्बल 90 व्हिडीओ...
Prajwal RevannaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 9:49 AM
Share

माजी खासदार प्रज्वल रेवन्ना सध्या बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र तरी देखील त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं दिसून येत आहे. प्रज्वल रेवन्नाचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. सध्या प्रज्वल रेवन्ना याला बंगळुरूतील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे, तिथे त्याच्याकडे एक मोबाईल आढळून आला आहे. प्रज्वल रेवन्ना हा बेकायदेशीररित्या मोबाईल वापरत होता, पोलिसांकडून हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. जेव्हा पोलिसांनी जप्त केलेला हा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना देखील धक्का बसला आहे, या मोबाईलमध्ये तब्बल 80 ते 90 डाऊनलोड केलेले पॉर्न व्हिडीओ आढळून आले आहेत. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार व्हिआयपी तसेच हाय प्रोफाइल कैद्यांच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात एक विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती, याचदरम्यान प्रज्वल रेवन्नाकडे हा मोबाईल आढळून आला आहे. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये एक -दोन नव्हे तर तब्बल 80 ते 90 डाऊनलोड केलेले पॉर्न व्हिडीओ आढळून आले आहेत. एवढंच नाही तर या मोबाईलमध्ये वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आलेले कमी कपड्यांमधील महिलांचे फोटो देखील आढळून आले आहेत.

दरम्यान आता हा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हे व्हिडिओ आणि प्रज्वल रेवन्नाकडे असलेला हा सर्व डिजिटल डेटा नेमका कधी आणि कसा डाऊलोड करण्यात आला, याचा तपास केला जाणार आहे. तसेच रेवन्ना सध्या बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत आहे, त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास होणार आहे. तसेच या प्रकरणात आता पोलिसांनी रेवन्नाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रताप राय नावाच्या एका कच्च्या कैद्याचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील रेवन्ना याच्याकडे मोबाईल नेमका कसा आला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...