AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly by Election result : 13 राज्यातील 29 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट; कोणत्या राज्यात कुणाला झटका, कुणाचा विजय?

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय संपादन केलाय. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना पराभव स्वीकारावा लागलाय. देशभरात आज लोकसभेच्या 3 तर 13 राज्यातील मिळून विधानसभेच्या 29 जागांचे निकाल स्पष्ट होत आहेत.

Assembly by Election result : 13 राज्यातील 29 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट; कोणत्या राज्यात कुणाला झटका, कुणाचा विजय?
Election-results
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 02, 2021 | 5:52 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. या पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झालाय. महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय संपादन केलाय. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना पराभव स्वीकारावा लागलाय. देशभरात आज लोकसभेच्या 3 तर 13 राज्यातील मिळून विधानसभेच्या 29 जागांचे निकाल स्पष्ट होत आहेत. (Assembly by-election results in 13 states, victory of which party’s candidate in which state?)

विधानसभेच्या 29 जागांपैकी भाजपकडे 6 आणि काँग्रेसकडे 9 जागा होत्या. अन्य जागा या स्थानिक राजकीय पक्षाच्या ताब्यात होत्या. या सर्व जागांसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडलं होतं. विधानसभा पोटनिवडणुकीत आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमधील प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर बिहार, कर्नाटक आणि राजस्थान प्रत्येकी 2 जागांवर मतदान पार पडलं होतं. तर हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली आहे.

कोणत्या राज्यात कुणाचं वर्चस्व?

पश्चिम बंगाल –

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. पश्चिम बंगालमधील चारही जागा त्यात शांतीपूर, दिनहाटा, गोसाबा आणि खडदहमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

बिहार –

बिहारमधील तारापूर आणि कुशेश्वर स्थान या विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक झाली होती. तारापूरमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी तर कुशेश्वर स्थानमध्ये जनता दल संयुक्तचा उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे.

आसाम –

आसामच्या भवानीपूर, मरियानी आणि थोरवामध्ये भाजप उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहे. तर तामुलपूर आणि गोसाईपूरमध्ये UPPL चे उमेदवार आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेश –

मध्य प्रदेशात भाजपला क्लीन स्वीप मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पृथ्वीपूर, जोबट, रैगांव या तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी आघाडीवर आहेत.

हिमाचल प्रदेश –

हिमाचल प्रदेशातील जुब्बल कोटखाईच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला आहे. तर फतेहपूर आणि अर्कीच्या जागेवरही काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत.

मेघालय –

मेघालयमधील मावरेंगकेंग वर UDP च्या उमेदवाराने आघाडी मिळवली आहे. तर मावफलांग आणि राजबाला मध्ये NPP उमेदवार आघाडीवर आहेत.

कर्नाटक –

कर्नाटकात बरोबरीत सामना सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकात दोन जागांवर निवडणूक पार पडली. त्यातील सिंदगीच्या जागेवर भाजप उमेदवार पुढे आहे तर हानगलच्या जागेवर काँग्रेस उमेदवारानं विजयी आघाडी घेतलीय.

राजस्थान –

राजस्थानमधील वल्लभनगर आणि धारियावादमध्ये काँग्रेस उमेदवारांनी विजयी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अन्य राज्यांमधील स्थिती

तर आंध्र प्रदेशातील बाडवेलच्या जागेवर वायएसआर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणातील ऐलनाबादच्या जागेवर INLD, मिझोराममधील तुईरिअलच्या जागेवर मिजो नॅशनल फ्रंटचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलंगणाच्या हुजूराबादमध्ये भाजप उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे.

इतर बातम्या :

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

Assembly by-election results in 13 states, victory of which party’s candidate in which state?

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...