ऑपरेशन सिंदूर ते जेट इंजिन आत्मनिर्भरतेबद्दल पीएम मोदी काय बोलले?
भारताच्या महत्वकांक्षी अवकाश मोहिमांची त्यांनी माहिती दिली. भारताच स्वत: स्पेस स्टेशन असेल, स्वदेशी अवकाश क्षमतेचे त्यांनी दाखले दिले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात 300 स्टार्टअप्स काम करतायत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात बोलताना आत्मनिर्भर भारत विकसित भारताचा पाया असल्याच सांगितलं. संरक्षण, टेक्नोलॉजी, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन क्षेत्रातील भारताने केलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरबद्दलही ते बोलले. आपल्याला जे धोके आहेत, त्याचा सामना करण्यासाठी रणनितीक स्वायत्तता आणि स्वदेशी क्षमता महत्त्वाची असल्याच त्यांनी सांगितलं. राष्ट्राची ताकद, आदर आणि 2047 च विकसित भारताच उद्दिष्टय गाठण्यासाठी आत्मनिर्भरता कणा असल्याच पीएम मोदी म्हणाले.
संरक्षण आत्मनिर्भरता आणि ऑपरेशन सिंदूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच कौतुक केलं. संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतचे ते प्रदर्शन होतं असं पीएम म्हणाले. त्यांनी स्वदेशी क्षमतेवर भर दिला. यामध्ये मेड इन इंडिया शस्त्र आहेत. यामुळे भारताला निर्णायक आणि स्वतंत्रपणे कारवाई करता आली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहता येणार नाही हे सिद्ध झालं.
जेट इंजिन आत्मनिर्भरता : स्वदेशी फायटर जेटसाठी देशातच इंजिन बनवण्याचं त्यांनी युवकांना आवाहन केलं. भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञान हे स्वदेशी आणि आत्मनिर्भर असलं पाहिजे.
सेमीकंडक्टर कधी येणार?
सेमीकंडक्टर आणि हाय-टेक लीडरशिप : या वर्षाच्या 2025 च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चीप भारत लॉन्च करेल असं पीएम मोदी यांनी जाहीर केलं. तांत्रिक दृष्टया कठीण समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात भारताची ताकद वाढत असल्याच हे उदाहरण आहे. जागतिक स्पर्धेसाठी एआय, सायबर सिक्युरिटी, डीप-टेक आणि ऑपरेटिग सिस्टिममध्ये प्रगती आवश्यक असल्याच ते म्हणाले.
पीएम मोदी यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाचा यांच्या कार्याच कौतुक केलं. भारताच्या महत्वकांक्षी अवकाश मोहिमांची त्यांनी माहिती दिली. भारताच स्वत: स्पेस स्टेशन असेल, स्वदेशी अवकाश क्षमतेचे त्यांनी दाखले दिले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात 300 स्टार्टअप्स काम करतायत. अवकाश क्षेत्रात भारताचा नुसता सहभाग नाहीय, तर अवकाश विज्ञान आणि संशोधनात भारत स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व करतोय असं पीएम मोदी म्हणाले.
ऊर्जा क्षेत्राबद्दल काय बोलले?
पीएम मोदी यांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या महत्वावर जोर दिला. युवकांच भविष्य, शेतकऱ्यांच कल्याण यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची असल्याच त्यांनी सांगितलं.
जग जागतिक तापमान वाढीवर चर्चा करतय. 2030 पर्यंत 50 टक्के स्वच्छ ऊर्जेच लक्ष्य गाठण्याच ठरवलेलं. पण लोकांचे आभार मानतो. 2025 मध्येच हे उद्दिष्टय गाठलं.
खासगी क्षेत्राच्या सहभागाने अणूऊर्जेचा विस्तार करण्याच लक्ष्य असल्याच पंतप्रधानांनी सांगितलं. सध्या 10 न्यूक्लियर रिएक्टर्स सुरु आहेत. 2047 पर्यंत अणूऊर्जेची क्षमता 10 पटीने वाढवण्याच लक्ष्य आहे. विकासासाठी ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यावर भर आहे.
