स्वप्नात आलेल्या कुत्र्याने आदेश दिला अन्… दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याची धक्कादायक कबुली
Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर ऑगस्टमध्ये हल्ला झाला होता. आता या प्रकणातील आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर ऑगस्टमध्ये हल्ला झाला होता. आता या प्रकणातील आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी राजेशभाई खिमजीभाई सकारियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. राजेशभाई खिमजीभाई सकारियाने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना चापट मारत त्यांचे केस ओढले आणि त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात 429 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
आरोपीचा धक्कादायक खुलासा
राजेशभाई सकारियाने स्वतःला श्वान प्रेमी म्हणवतो. त्याने असा दावा केला की, ऑगस्टमध्ये पडलेल्या स्वप्नामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याची प्रेरणा मिळाली. एक स्वप्न पडल्यानंतर त्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा कट रचला. आरोपपत्रात राजेशने म्हटले की, ‘एके रात्री स्वप्नात मला माझ्या मंदिरातील शिवलिंगाजवळ एक कुत्रा उभा असलेला दिसला. या मंदिरात अनेक भटके कुत्रे असतात. शिवलिंगाजवळ उभ्या असलेल्या कुत्र्याने मला सांगितले की, दिल्लीतील अनेक कुत्रे खूप अडचणीत आहेत.
हे स्वप्न पडल्यानंतर राकेशने पत्नीला आणि बापू नावाच्या मित्राला दिल्लीत उपोषण करणार आहे असे सांगितले. तसेच मला विरोध करणाऱ्याला मारून टाकेल असंही त्यांना त्या दोघांना सांगितले. यानंतर तो दिल्लीला जाण्याची परवानगी घेण्यासाठी उज्जैनला गेला, तिथे महाकालची परवानगी घेतल्यानंतर तो दिल्लीला गेला. या आरोपपत्रात असाही उल्लेख आहे की, मे महिन्यात राजेशभाईंनी माकडाच्या मुद्द्यावरून अयोध्येत उपोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
ऑगस्टमध्ये दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत चर्चा सुरू होती, काही लोकांनी आंदोलनेही केली. याचे व्हिडिओ रोजेशभाईंनी पाहिले. त्याला वाटले की या समस्येला मुख्यमंत्री रेखा गुप्ता जबाबदार आहेत. त्यानंतर साकरियाने 20 ऑगस्ट रोजी एका जनता दरबारमध्ये मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता दाखल झालेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर, राजेशभाईंच्या आईने म्हटले होते की, माझा मुलगा कुत्राप्रेमी आहे, मात्र त्याला मानसिक समस्या देखील आहेत. 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील अधिकाऱ्यांना सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याचा आदेश दिला होता. या आदेशामुळे तो नाराज झाला होता.
