AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा

Ayodhya Ram Mandir : सध्या देशभरात गाजत असलेल्या अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा पडला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन हा राजीनामा द्यावा लागला आहे.

Ayodhya Ram Mandir :  अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा
Ayodhya Ram Mandir
| Updated on: Jun 26, 2026 | 1:48 PM
Share

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे. दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. ते विरोधी पक्षांच्या रडारवर होते. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. चंपत राय यांच्याशिवाय ट्रस्टचे दुसरे सदस्य अनिल मिश्रा यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. अयोध्या श्रीराम जन्मभूमि मंदिर कथित दान अनियमितता प्रकरणात शुक्रवारी ही मोठी घडामोड घडली. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली आहे. त्यांचा प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

अयोध्या राम मंदिरात मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येत असतात. आपल्या श्रद्धेनुसार ते दान पेटीत पैसे टाकतात. पण तिथे काही लोकांनी भक्तांची आस्था आणि श्रद्धा याची बिलकुल तमा बाळगली नाही. ते दानातून आलेल्या पैशांची चोरी करायचे आणि त्याच पैशाने आपले शौक पूर्ण करत होते. यात राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे काही लोक सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

कशी चालायची चोरी

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राम मंदिर ट्रस्टशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी बँकेत जमा होणाऱ्या रक्कमेचा आणि रोज दान पेटीत जमा होणार्‍या रक्कमेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. एकादान पेटीत एकावेळी 6 ते 7 लाख रुपये जमा व्हायचे. पण काही आठवडे 500 रुपयांच्या नोटांची बंडलं कमी आढळली. त्यावेळी संशय आला. नोट मोजणाऱ्याच्या खोलीत हिडन कॅमेरे लावले. हिडन कॅमेऱ्याचं एक आठवड्याच फुटेज पाहिल्यानंतर लक्षात आलं की, नोट मोजण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले कर्मचारी सीसीटीव्ही समोर उभे राहतात आणि दुसरा सहकारी नोटांच्या बंडलातील नोट चोरी करुन कपड्यात लपवायचा.

ही चोरी अजून एकाप्रकारे व्हायची

अनुकल्प मिश्रा आणि अन्य आरोपी नोटांची बंडलं बाथरुममध्ये लपवायचे. मग संधी साधून मंदिराबाहेर घेऊन जायचे. मग एका खोलीत पैशांची वाटणी व्हायची. हा खेळ बऱ्याच काळापासून सुरु होता. ही चोरी अजून एकाप्रकारे व्हायची. नोट मोजणारे कर्मचारी प्रत्येक बंडलामध्ये अजून एक्स्ट्र नोटा टाकायचे. बँक कर्मचाऱ्यांकडे नोटा मोजणीसाठी जायच्या त्यावेळी प्रत्येक बंडलातील एक-एक नोट मोजण्याऐवजी फक्त बंडल मोडून वाउचर बनायचं.

ही रक्कम जेव्हा मंदिरातून जमा करण्यासाठी बँकेत न्यायचे. त्यावेळी एक्स्ट्रा नोटा काढून घ्यायचे. अनुकल्प मिश्रा दानाशी संबंधित वाउचर बनवण्याच्या प्रक्रियेशी जोडलेला. ही हेराफेरी तो नातेवाईक लव कुश मिश्राच्या साथीने करायचा.

Follow Us