AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी IAS अधिकाऱ्याने अयोध्या मंदिरात दिले सोन्याचे रामचरित्रमानस, एक हजार पाने, किंमत पाच कोटी

ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरित्रमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्रीरामांच्या दर्शनासह या सुवर्णग्रथांचेही दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरात रामचरित्रमानस ठेवण्यासाठी खास स्टँडही तयार केले आहे.

माजी IAS अधिकाऱ्याने अयोध्या मंदिरात दिले सोन्याचे रामचरित्रमानस, एक हजार पाने, किंमत पाच कोटी
अयोध्या राम मंदिरास भेट दिलेली रामचरित्रमानस.
| Updated on: Apr 12, 2024 | 7:40 AM
Share

राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. देशभरातून नाही तर जगभरातून राम मंदिरासाठी भाविक देगण्या देत आहेत. आता राम मंदिरासाठी एका भाविकाने सोन्याचे राम चरित्रमानस भेट दिले आहे. मध्य प्रदेशातील माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला ही भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिरात चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर मंगळवारी या रामचरित्रमानसची स्थापना करण्यात आली. त्याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

कोणी दिली भेट

मध्य प्रदेशातील कॅडरचे माजी आयएसए अधिकारी सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी भेट दिलेली रामचरित्रमानसच्या ताम्रपत्रावर सोन्याच्या अक्षरे आहेत. ही रामचरितमानस रामललांच्या गर्भगृहात ठेवण्यात आले आहे. विधीपूर्वक त्या रामचरित्रमानसची पूजा करण्यात आलीय. ही रामचरित्रमानस एक हजार पानांची आहे. त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे.

माजी आयएसए अधिकारी सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी भेट दिलेली रामचरित्रमानस

अशी आहे रामचरित्रमानस

अल्ट्राव्हायोलेट प्रिटींग तंत्रज्ञानाचा वापर करुन सोन्याच्या पानांवर रामचरित्रमानसमधील मजकूर लिहिला गेला आहे. त्याची निर्मिती चेन्नईच्या बुममंडी बंगारु ज्वेलर्सकडून करण्यात आली. या रामचरित्रमानसची निर्मिती करण्यासाठी सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला. या रामचरित्रमानसचे वजन १.५ क्विंटल आहे. त्यात १० हजार ९०२ खंड आहे.

रामचरित्रमानस

भाविकांना घेता येणार दर्शन

राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरित्रमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्रीरामांच्या दर्शनासह या सुवर्णग्रथांचेही दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरात रामचरित्रमानस ठेवण्यासाठी खास स्टँडही तयार केले आहे, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे न्यासचे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले.

रामनवमीच्या दिवशी 20 तास दर्शन

अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला भाविकांना जास्त वेळ दर्शन मिळणार आहे. मंदिर 20 तास खुले राहणार आहे. 15 एप्रित ते 17 एप्रिल दरम्यान ही व्यवस्था असणार आहे. अयोध्येत 100 ठिकाणी एलईडी स्क्रिनवर रामनवमीचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. राम नवमीला विक्रमी संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.