कार जागीच सोडून डॉक्टर धावत सुटले, काही मिनिटात 3 किमी, बंगळुरूत काय घडलं?

माझी टीम ऑपरेशनसाठी तयार होती. पण वाटेत ट्रॅफिक जाम झाले. मी खूप वेळ वाट पाहिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मी आणखी विचार करत बसण्यापेक्षा कार तिथेच सोडून निघालो, असं डॉक्टरांनी सांगतिलं.

कार जागीच सोडून डॉक्टर धावत सुटले, काही मिनिटात 3 किमी, बंगळुरूत काय घडलं?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:51 PM

बंगळुरूः डॉक्टरांमध्ये माणुसकी उरली नाही, असा आरोप नेहमी केला जातो. मात्र बंगळुरूतली घटना वाचून अनेकांचं मत परिवर्तन होईल. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू (Bangalore) असमानी संकटानं हैराण आहे. आयटी हब, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूत पूरस्थितीने (Heavy Rain) घरात, शहरात पाणीच पाणी होतं. रस्त्यावरही पाणी (Flood) साचल्यानंतर लोकांनी होड्यांनी प्रवास केला. सध्या हे संकट काहीसं निवळलंय. पण 30 ऑगस्टमध्ये ऐन अडचणीच्या काळातला एक प्रसंग चांगलाच चर्चिला जातोय. माणुसकी अजूनही शिल्लक आहे, असं म्हटलं जातंय.

काय घडलं?

बंगळुरूत मणिपाल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गोविंद नंदकुमार हे सर्जन आहेत. गॅस्ट्रोंट्रोलॉजीचे सर्जन. 30 ऑगस्ट रोजी एका महिलेवर इमर्जन्सी लॅप्रोस्कोपिक गॉलब्लॅडर सर्जरी करायची होती.

डॉक्टर घरातून वेळेवर निघाले. रुग्णालयात टीमने ऑपरेशनची पूर्ण तयारी केली होती. पण रस्त्यात पूरस्थितीमुळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाला. सरजापूर-माराथल्लीदरम्यान अनेक गाड्या अडकून पडल्या.

खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही वाहतूक पुढे धकत नव्हती. महिलेचं ऑपरेशन वेळेवर करणं गरजेचं होतं. अन्यथा तिच्या जीवावर बेतणार होतं.

डॉक्टरांना काय करावे काहीच सूचत नव्हते. अखेर त्यांनी कार तिथेच सोडली आणि रुग्णालयापर्यंत धावत सुटले.

डॉक्टर गोविंद सलग 3 किमी अंतर धावत गेले. रुग्णालय गाठलं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन आपलं कर्तव्य बजावलं.

ऑपरेशनची टीम सज्ज होती. डॉक्टर वेळेवर पोहोचले. ते ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच रुग्णाला अॅनस्थेशिया दिला गेला.

वेळेवर उपचार झाल्याने रुग्णाचे प्राण वाचले. आज सदर महिलेला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांची आज चर्चा होतेय.

या प्रसंगाविषयी सांगताना डॉक्टर म्हणाले, ‘ मी दररोज मध्य बंगळुरूतील सारजापूर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जातो. ते दक्षिण पूर्व बंगळुरूत आहे. त्या दिवशीही मी वेळेत घरून निघालो. माझी टीम ऑपरेशनसाठी तयार होती. पण वाटेत ट्रॅफिक जाम झाले. मी खूप वेळ वाट पाहिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मी आणखी विचार करत बसण्यापेक्षा कार तिथेच सोडून निघालो. कारमध्ये ड्रायव्हर होता, त्यामुळे काही प्रश्न आला नाही…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.