बँकेतील कामं आताच करुन घ्या, या दिवसांपासून सलग सहा दिवस सुट्टीच…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 21 ऑक्टोबरनंतरच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर दिवाळी, गोवर्धन पूजा आणि दुसऱ्या दिवशीही बँक बंद राहणार आहेत.

बँकेतील कामं आताच करुन घ्या, या दिवसांपासून सलग सहा दिवस सुट्टीच...
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 5:49 PM

नवी दिल्लीः सध्या दिवाळीचा सण काही तासांवर आला असून धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीची यादीही आता जवळपास सगळ्यांची तयारही झाली असले. घरापासून ते बाजारपेठेपर्यंत या सणाचा जोरदार जल्लोष दिसून येत आहे. या अशा सणासुदीच्या काळात सुट्ट्याही (Holiday) भरपूर असतात. परंतु जर तुम्ही बँकिंगशी (Banking) संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण केले नसेल तर कोणत्याही परिस्थितीत ते आताच पूर्ण करुन घ्या. कारण शनिवारी 22 ऑक्टोबरपासून बँका सलग 6 दिवस आता बंद राहणार आहेत.

या महिन्यातील 10 दिवसांपैकी आठ दिवस देशातील विविध भागांमध्ये सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरही बँकेत जाणार असाल तर मात्र एकदा कॅलेंडर तपासूनच तुमची बँकेतील कामं करुन घ्या.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 21 ऑक्टोबरनंतरच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर दिवाळी, गोवर्धन पूजा आणि दुसऱ्या दिवशीही बँक बंद राहणार आहेत.

तथापि, बँक सुट्ट्या राज्ये आणि आणि शहरांमध्ये बदल असतात. अनेक राज्यांतील प्रमुख सणांच्या दिवशी फक्त त्या राज्यांतील बँकांना सुट्टी असते.

या आठवड्यातील शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह सलग सहा दिवस बँका बंद राहणार असल्याने अनेकांच्या कामांचा खोळंबा होणार आहे.

बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही त्या त्या सुट्ट्या अवलंबून असतात.

सणासुदीच्या काळात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित कामं ऑनलाइन पद्धतीनेही करू शकता.

ही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून ऑनलाइन बँकिंगद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार सहज करू शकणार आहात.

दिवाळीच्या या सुट्ट्या असल्या तरी बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात. त्यामुळे शनिवारी तुमच्या ऑफिसला सुट्टी असेल तर तुम्ही या दिवशीही जाऊन तुमची महत्त्वाची कामं करू शकणार आहात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.