Banks Holidays: डिसेंबरमध्ये 18 दिवस बँका राहणार बंद, आताच करा नियोजन
भारतात अनेक सणांमुळे बँकांना बरेच दिवस सुट्टी येते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीमुळे काही दिवस बँकांना सुट्टी होती. त्यानंतर आता डिसेंबरमध्ये देखील १८ दिवस बँका बंद राहणार आहे. वेगवेगळ्या राज्यात स्थानिक सणांनुसार बँकांना सुट्टी असते. पाहा डिसेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
December 2023 Holidays : सणासुदीच्या हंगामासोबतच नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे. आता डिसेंबरमध्ये बँकांचा संप आणि सुट्ट्यांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर लगेचच त्याचे नियोजन करुन घ्या. सुट्ट्यांची यादी पाहून कामे ठरवून घ्या म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही. सुट्ट्यांव्यतिरिक्त बँक संघटनांच्या संपामुळे देखील बँका बंद राहणार आहेत. पाहा कोणते १८ दिवस बँका बंद राहणार आहेत.
बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न आहेत. बँका बंद असल्या तरी सुट्टीच्या काळात तुम्ही तुमचे काम नेट बँकिंगद्वारे करू शकता.
डिसेंबर 2023 मधील बँक सुट्ट्या
1 डिसेंबर 2023- अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये राज्य उद्घाटन दिनानिमित्त बँकेला सुट्टी असेल.
3 डिसेंबर 2023- महिन्याच्या पहिल्या रविवारमुळे बँका बंद राहतील.
4 डिसेंबर 2023- सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्टिव्हलमुळे गोव्यात बँका बंद राहतील.
9 डिसेंबर 2023- महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
10 डिसेंबर 2023- रविवारमुळे बँकेला सुट्टी असेल.
12 डिसेंबर 2023- मेघालयमध्ये पा-टोगन नेंगमिंजा संगमामुळे बँकेला सुट्टी असेल.
13 डिसेंबर 2023- लोसुंग/नमसुंगमुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.
14 डिसेंबर 2023- लोसुंग/नामसुंगमुळे सिक्कीममधील बँकांना सुट्टी असेल.
17 डिसेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
18 डिसेंबर 2023- मेघालयमध्ये यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
19 डिसेंबर 2023- मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँकांना सुट्टी असेल.
23 डिसेंबर 2023- महिन्याचा चौथा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
24 डिसेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँकांना सुट्टी.
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या उत्सवामुळे मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये बँका उघडणार नाहीत.
27 डिसेंबर 2023- नाताळनिमित्त नागालँडमध्ये बँकेला सुट्टी.
30 डिसेंबर 2023- मेघालयात U Kiang Nangbah च्या पार्श्वभूमीवर बँका उघडणार नाहीत.
31 डिसेंबर 2023- रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.