जम्मू-काश्मीर : लष्कराच्या तळाची बॅरेक कोसळली; दोन जवान शहीद

भिंत कोसळल्याने लष्कराचे सुबेदार आणि एका नायकाचा मृत्यू झाला आहे. तर हवालदार रँकचा जवान गंभीररित्या जखमी झाला आहे.

जम्मू-काश्मीर : लष्कराच्या तळाची बॅरेक कोसळली; दोन जवान शहीद
Representative Image

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या तळाची बॅरक कोसळल्याने दोन जवानांना वीरमरण आले आहे (Barrack Collapse In Jammu-Kashmir). तर एक जवान गंभीररित्या जखमी झाले आहे. कठुआ जिल्ह्याचील माछेडी परिसरात शुक्रवारी ही दुर्घटना घडली. जखमी जवानाला सध्या पठानकोट येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत (Barrack Collapse In Jammu-Kashmir).

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिंत कोसळल्याने लष्कराचे सुबेदार आणि एका नायकाचा मृत्यू झाला आहे. तर हवालदार रँकचा जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी जवानाला पुलवामाच्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे.

शुक्रवार सायंकाळच्या सुमारास हे जवान बॅरकवर काम करत होते. यादरम्यान, बॅरकची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 3 जवान भिंतीखाली दबले.

या घटनेट दोन जवानांना वीरमरण आलं. त्यापैकी एक हरयाणाचे राहणारे सूबेदार एसएन सिंह आहेत. तर दुसरे जवान हे नायक प्रवीण कुमार आहेत. ते सांबा येथील राहणारे आहेत. तर हवालदार मंगलसिंह जखमी झाले आहेत.

नागनाथ लोभे आणि सुजित किर्दत यांना वीरमरण

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना सीयाचीन आणि सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना अपघातात वीरमरण आलं होतं

नागनाथ लोभे यांना सियाचीनमध्ये वीरमरण

शहीद जवान नागनाथ लोभे हे रविवारी सकाळी सियाचीन भागात गस्तीवर गेले होते. यादरम्यान, त्यांची गाडी खोल दरीत कोसळली आणि त्यात गस्तीवर असलेल्या पाचही जवांनाचा मृत्यू झाला. सध्या नागनाथ लोभे यांचे पार्थिव उमरगा (हाडगा) येथे आणण्याची प्रक्रिया सुरु असून आज त्यांचं पार्थिव गावी पोहोचणार आहे. त्यानंतर गावातच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

दोन दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले. साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत यांना वीरमरण आले आहे.

Barrack Collapse In Jammu-Kashmir

संबंधित बातम्या :

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

महाराष्ट्राचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना कारगिलमध्ये वीरमरण; रविवारी होणार अंत्यसंस्कार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI